Breaking News

दिव्या कशी झाली 22 व्या वर्षी IPS अधिकारी? वाचा

सरकारी शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या दिव्याला लहानपणापासूनच अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या आहेत. लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. गरिबी आणि बिकट परिस्थिती असतानाही दिव्याचे मोठी, प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याचे ध्येय असून तिने ते साध्य केले. तिने केलेल्या या खडतर आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊ…

तिचा संघर्ष पाहून, एखादी गोष्ट करण्याचे मनाशी घट्ट ठरवल्यानंतर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही हे दिसून येते.

दिव्या हरियाणामधील महेंद्रगड येथील असून, सुरुवातीला तिचे शिक्षण सरकारी शाळेमध्ये झाले आहे. नंतर तिची महिंद्रगडमधील नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आली होती. २०११ साली दिव्या केवळ ८ किंवा ९ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती.

संपूर्ण कुटुंबाला सांभाळण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी दिव्याची आई, शेतामध्ये मजुरीची कामे करत असे. तसेच शिवणकाम करून दिव्या आणि तिच्या दोन भावंडांचा सांभाळ करायची.

अशा सर्व हलाखीच्या परिस्थितीचा सामना करून, दिव्याने विज्ञान क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच तिने ताबडतोब UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. ही परीक्षा देणे आणि त्यात उत्तीर्ण होणे हे दिव्याचे लहानपणीपासूनचे स्वप्न होते.

मात्र, इतरांप्रमाणे दिव्याला या परीक्षेचे कोचिंग परवडणारे नव्हते. तरीही ऑनलाइन उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचा आणि चाचणी परीक्षांचा वापर करून, प्रचंड मेहेनत दिव्याने घेतली. २०२१ मध्ये तिने आपली पहिली UPSC परीक्षा दिली. त्यामध्ये संपूर्ण देशात ४३८ वा क्रमांक पटकावला आणि दिव्या भारतातील सर्वात कमी वयात IPS बनलेली पहिली व्यक्ती ठरली.

परंतु, दिव्या इतक्यावरच थांबली नाही. तिने पुन्हा २०२२ साली UPSC परीक्षा दिली. यात तिने देशभरातून १०५ हे स्थान पटकावले आणि IAS बनली. हे सर्व तिने कोणत्याही प्रकारचे कोचिंग न लावता, स्वतःच्या मेहेनतीवर करून दाखवले आहे.

तिच्या या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून, इच्छुक उमेदवारांना अधिक प्रोत्साहन देण्याचे काम ती माहिती आणि सामग्री पोस्ट शेअर करून करत असते. तिचे या सोशल मीडिया माध्यमावर ९७ हजार इतके फॉलोवर्स आहेत, अशी सर्व माहिती DNA च्या एका लेखावरून समजते.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या नावे खासगी व्यक्तीने घेतली नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुंबईतील ‘सुरुची’ या शासकीय निवासस्थानी …

४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये धाकधूक : बोगस अपंग प्रमाणपत्राची शोध मोहिम

निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर याच पद्धतीने इतर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बनावट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *