Breaking News

मोठी बातमी : एकनाथ खडसे BJP मध्ये प्रवेश करणार! मंत्री गिरीश महाजनांचा विरोध?

Advertisements

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. काल अशोक चव्हाण यांनी अचानक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्याशिवाय काँग्रेस सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला. अशोक चव्हाण मागच्या काही दिवसांपासून भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आता हा अंदाज प्रत्यक्षात येताना दिसतोय.

Advertisements

अशोक चव्हाण आज दुपारी भाजपात प्रवेश करतील अशी माहिती आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधील अंतर्गत खदखद बाहेर आलीय. अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे अजूनही काही आमदार नाराज असून ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील असं बोलल जातय. अशोक चव्हाण हे एक मोठ नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलय. त्याशिवाय नांदेड जिल्ह्यातील ते एक वजनदार नेते आहेत. अशा नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा अजून बळकट होणार आहे.

Advertisements

अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी एक दुसरे मोठे नेते भाजपात पूनर्प्रवेशासाठी सक्रीय झाल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याच बोलल जातय. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून ते विधान परिषदेत आमदार आहेत. एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. विविध खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण त्यांच्यावर आरोप झाल्याने खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे बाजूला फेकले गेले. अखेर सततच्या दुर्लक्षामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शासकीय रुग्णवाहिकेला(ऍम्ब्युलन्स)ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *