Breaking News

उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी केला भुसंपादनात अडीच कोटीचा अपहार

Advertisements

वर्धेच्या तत्कालीन भूसंपादन अधिकारी आणि सध्या परभणी येथे कार्यरत उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी 2 कोटी 64 लाखांचा अपहार केल्याची चर्चा आहे.

Advertisements

योजनेसाठी जमीन अधिग्रहण ही प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि ती जबाबदारी भूसंपादन अधिकाऱ्याकडे असते. वर्धेत 2022 ते 2024 पर्यंत या पदावर कार्यरत स्वाती सूर्यवंशी यांनी 2 कोटी 64 लाखाच्या रकमेवर डल्ला मारल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Advertisements

स्वाती सूर्यवंशी या वर्धेच्या उपजिल्हाधिकारी, लघु सिंचन कालवे प्रकल्पच्या भुसंपादन अधिकारी म्हणून 17 फेब्रुवारी 2022 ला रुजू झाल्या होत्या. वर्धा येथे या पदावर 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत म्हणजे 2 वर्ष 26 दिवस कार्यरत होत्या. दरम्यान सूर्यवंशी यांनी या पदावर असतांना शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाली. यावरून जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम या कार्यालयातील कागदपत्र सील करत समिती स्थापन करून चौकशीला सुरवात केली. चौकशीत समुद्रपूर तालुक्यातील 25 वर्ष पूर्वी वाटप केलेल्या 16 प्रकल्पग्रस्ताच्या नावाने 2 कोटी 13 लाख 28 हजार 311 रुपये खोटे कागदपत्राच्या आधारे काढण्यात आले. तर कोषागार कार्यालयातील शासकीय खात्यातून पाच लोकांच्या नावे 50 लाख 85 हजार 424 रुपये दोन पतसंस्थेत बनावटी खाते तयार करून वळत केल्याची बाब समोर आली.

सूर्यवंशी यांनी केलेल्या अपहार प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. 25 वर्षांपूर्वी निवड झालेल्या प्रकल्पाच्या नावाने ज्या शेतकऱ्यांचे नाव निवड्यात नाही. मोबदला मिळण्याबाबत अर्ज सुद्धा सादर केला नाही; अश्या लोकांच्या नावाने पैसे काढण्यात आले. सोबतच या प्रकरणात वर्धेच्या शेतकरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वर्धा व आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाट यांच्यासोबत सूर्यवंशी यांनी संगणमत करून बनावटी कागदपत्रांच्या आधारे खोटे खाते तयार करून पैसे काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ माजली असून महिला उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर या पूर्वी सुद्धा काही प्रकरणात कारवाई झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

महिला अधिकाऱ्याची बदली होताच या विभागात अपहार झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना मिळाली. जिल्हाधिकारी यांनी तातडीने समिती गठीत करत कागदपत्रांची तपासणी केली. यावरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. प्रकरणी वर्धा शहर पोलिसात तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार व कोणाला कोणाला अटक करणार? हे येत्या काळात कळेल. यातील मुख्य आरोपी स्वाती सूर्यवंशी या सध्या परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सामान्य या पदावर कार्यरत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

1 रुपयांचेच वेतन घेतो IAS अधिकारी : वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे …

वनकर्मचारी निलंबित : ‘ईव्हीएम’चे व्हाट्सअप स्टेटस भोवले

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *