Breaking News

निवडणुकीतील पैसा गेला कुठे? भाजप आमदार भडकले

निवडणूकीत भाजपला पराभवाचा फटका बसला. त्याचे निरीक्षण पक्षपातळीवर सुरू आहे. त्यापूर्वी पराभव कुणामुळे झाला याचेही पडसाद उमटले. आरोप प्रत्यारोप झाले. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूच्या पराभवाबाबत माहिती घेण्यासाठी प्रदेश भाजपने आमदार प्रवीण दटके यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली.

 

आ. दटके यांनी प्रिया पॅलेसमध्ये पराभूत उमेदवार रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. प्रताप अडसड, लोकसभा प्रभारी सुमीत वानखेेडे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट व अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते प्रत्येकाशी बंदद्वार चर्चा करीत होते. यावर आ. केचे यांनी जोरदार आक्षेप घेतले. एकेकट्यांशी कशाला बोलता, सर्वांसमक्ष बोला. निवडणूकीत काय ताल झाला, हे सगळ्यांनाच कळू द्या. नियोजन नव्हते. घरात बसून होतेे. पैश्यांभोवती खेळत राहले. आलेला पैसा गेला कुठे, जबाबदारी असलेले कसे घरात बसून होते, हे कळले पाहिजे, असा भडिमार केचे यांनी केल्याचे समजले. तसेच यावर दटके यांनी काय भूमिका घेतली, अशी विचारणा केल्यावर ते काय आपल्यासमोर बोलणार, असे केचे म्हणाले.

 

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतांना आ. प्रवीण दटके यांनी ही बाब फेटाळून लावत असे काहीच घडले नसल्याचे सांगितले. दटके म्हणाले की वर्धा लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षांनी केलेले आरोप हाणून पाडण्यात आम्ही कमी पडलो, हे मान्य करावे लागेल. शेतकऱ्यांच्या नाराजीचा मुद्दा होताच. संविधान बदलणार हा विरोधकांनी केलेले प्रचार आमच्या विरोधात भारी पडला. मोदी मॅजीक चालले नाही असे मी म्हणणार नाही. विविध कारणे होती. त्याबद्दल आज मते जाणून घेतली. आपण पराजयाच्या कारणांचा अहवाल पाठवणार. कोणी एक दोषी असतो असे नाही. मतदानापूर्वी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या मतदारसंघात भाजप उमेदवारास मताधिक्य न मिळाल्यास त्याला आगामी विधानसभा निवडणूकीत तिकिट देण्याबाबत विचार केल्या जाईल, अशी तंबी दिली होती. आताही हा निकष राहणार कां, असा प्रश्न केल्यावर आ.प्रवीण दटके म्हणाले की ही बाब वरिष्ठ पातळीवर ठरणार असून आज त्याबाबत सांगता येणार नाही. आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करीत असल्याचे ते म्हणाले. माजी खासदार रामदास तडस यांनी माझा कुणावरही आक्षेप नसून सर्वांनी माझ्यासाठी काम केल्याची भावना असल्याचे ते म्हणाले. यावेळी राजेश बकाने, मिलिंद भेंडे, श्रीमती वानखेडे व अन्य उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

वंचितचे उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांची घराणेशाही व जातीय राजकारणावर घणाघाती टीका

वंचितचे उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांची घराणेशाही व जातीय राजकारणावर घणाघाती टीका रामबाग, नागपूर, ९ …

काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची उमेदवारी धोक्यात?नागपूर हायकोर्टात कधी सुनावणी?

काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रावर आक्षेप नोंदवित त्यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *