Breaking News

उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना 50 हजार लाच घेताना अटक

Advertisements

जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात ५० हजार रुपयाची लाच घेताना मुंबई च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली असताना त्यांनी पदभार सोडला नव्हता.

Advertisements

 

मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली. पालघर मधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर येथे झाली होती. मात्र एक वर्ष वाढवून मिळावे ह्यासाठी ते प्रयत्नशील होते.

Advertisements

 

वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच मागितली होती.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ मजली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *