Breaking News
Oplus_131072

IAS अधिकाऱ्यांच्या बदलीत मंत्र्यांचा हस्तक्षेप : जिल्हाधिकाऱ्यांची बदली रोखली

Advertisements

वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी करण्यात आली होती. ही बदली रद्द करत शासनाने आता या पदावर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनिषा खत्री यांची नियुक्ती केली. खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. कर्डिले यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. मनपा आयुक्तांच्या बदलीनाट्यात राजकीय राजी-नाराजीचा पदर असल्याची चर्चा आहे.

Advertisements

भूसंपादनात विशिष्ट विकसकांना् झुकते माप, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काही निविदा आणि वारंवार सुट्टीवर असणे अशा कार्यशैलीने चर्चेत राहिलेले मनपाचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची शासनाने उचलबांगडी केली. त्यांच्या जागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाकडून हे आदेश निघाले आणि राजकीय पटलावर महापालिकेवर प्रभाव राखण्याविषयी चर्चा सुरू झाली. एका मंत्र्याने विश्वासात न घेता परस्पर नियुक्ती झाल्याचा आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. परिणामी, कर्डिले यांच्या नियुक्तीला २४ तासांच्या आत स्थगिती देण्याची वेळ आली. यावर राजकीय पटलावर मंथन झाल्यानंतर गुरुवारी सामान्य प्रशासन विभागाने बदली व नियुक्तीचे नवीन आदेश काढले.

Advertisements

 

या आदेशानुसार नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनिषा खत्री यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. सध्याच्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्यास त्यांना सांगण्यात आले. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आधीच्या बदली आदेशात अंशत: बदल करून त्यांची नियुक्ती नवी मुंबई येथे सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.

नाराजीचा सूर आणि….

महापालिका आयुक्त बदली आणि नियुक्ती घटनाक्रमाचा संबंध राजकारणाशी जोडला जात आहे. महापालिकेवर प्रभाव राखण्याचा महायुतीतील तीनही पक्षांचा प्रयत्न आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने मनपाचे आयुक्तपद महत्वाचे मानले जाते. या नियुक्तीत आपणास विश्वासात घेण्यात आले नसल्याचा सूर एका मंत्र्याने आळवल्यानंतर कर्डिले यांच्या बदलीस स्थगिती दिल्याचे बोलले जाते. त्यानंतर मनिषा खत्री यांच्या मनपा आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश निघाले. कर्डिले यांना सिडकोत मोठी जबाबदारी देण्यात आली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

न्याय के लिए गुहार लगा रहे है कोराडी पावर प्लांट AHP के अनुबंध श्रमिक

न्याय के लिए गुहार लगा रहे है कोराडी पावर प्लांट AHP के अनुबंध श्रमिक नागपुर। …

भीषण आग की लपटों के साथ 100 मीटर तक दौड़ता रहा ट्रक

भीषण आग की लपटों के साथ 100 मीटर तक दौड़ता रहा ट्रक टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *