Breaking News

नागपुरच्या धंतोलीत ११ नवीन हॉस्पिटलला मंजुरी : वाहतूक कोंडीची समस्या वाढणार

नागपुरातील धंतोलीमध्ये रुग्णालयांमुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. यातच महापालिकेने मागील वर्षभरात येथे पुन्हा ११ नवीन रुग्णालयांना परवानगी दिली आहे. अमर्यादित रुग्णालयांमुळे धंतोली आणि रामदासपेठ भागात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: धंतोलीत गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. अनेक रुग्णालयांनी वाहनतळाच्या जागेवर औषधालय, लॉन्ड्री करणे, ऑक्सिजन प्लांट, चेंबर तयार केले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे धंतोलीच्या गल्लीबोळात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते.

धंतोली-रामदासपेठ भागात सुमारे ११५ रुग्णालये व क्लिनिक आहेत. त्यामुळे या भागात आणखी रुग्णालय बांधण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी धंतोली येथील नागरिकांची आहे. परंतु महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करीत २०२४ मध्ये आणखी ११ रुग्णालयांना परवानगी दिली. याबाबत महापालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या तपशीलानुसार, शहरातील ६५४ खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडे नोंद केली. यात ९८९ क्लिनिक आणि २११ पॅथलॅब आहेत. केवळ धंतोलीत ६२ रुग्णालयांची नोंद आहे. यात २०२४ मध्ये पुन्हा ११ नवीन रुग्णालयांची भर पडली आहे.

नोंदीपेक्षा अधिक रुग्णालये

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या नोंदीपेक्षा अधिक रुग्णालये आणि क्लिनिक या भागात सुरू आहेत. त्यांच्याकडे वाहनतळ नसल्याने या वसाहतीमधील नागरिकांना वाहतूक कोडींच्या समस्येला सामोरे जावे लागते. याव्यतिरिक्त इतर दुकाने, खाद्यपदार्थ्यांची दुकाने आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या आणखी गंभीर झाली आहे.

About विश्व भारत

Check Also

अर्जुन सदाशिव गोमासे यांचे निधन

  अर्जुन सदाशिव गोमासे यांचे निधन कमाल चौक नवा नकाशा येथील रहिवासी, अर्जुन सदाशिव गोमासे …

कोंबडीचे चिकन खाल्ल्यास नव्या आजाराचा धोका : सावध व्हा!

महाराष्ट्रात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा दुर्मिळ आजार विषाणू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *