Breaking News

पदोन्नतीसंदर्भात राखीव प्रवर्ग बिंदूनामावली अंमलात आणा

Advertisements

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरती आणि पदोन्नतीकरीता असलेल्या 100 पदांच्या बिंदूनामावलीत एससी, एसटी, विजभज, ओबीसी, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर व्हावा तसेच या संदर्भातील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, निर्णयप्रक्रिया राबविताना कोणावरही अन्याय होऊ नये अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या .                                        यासंदर्भात सामान्य प्रशासन, विधी व न्याय, गृह, शिक्षण आदी संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येऊन अंमलबजावणीची दिशा स्पष्ट व्हावी असेही आज विधानभवनात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.                                                                   भरती तसेच पदोन्नती प्रक्रिया राबविताना सध्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, केंद्र सरकारच्या सूचना आणि राज्य सरकार यांचे बिंदूनामावली संदर्भातील धोरण वेगवेगळया पद्धतीने अंगीकारले जात आहे. त्यामध्ये एकसूत्रता नाही, अशी माहिती पुढे येत आहे. प्रत्येक विभागाने बिंदूनामावलीबाबत वेगळा नियम न लावता सरळसेवेची पदे ज्या बिंदूनुसार आहेत तशीच भरण्यात यावीत. सामान्य प्रशासन आणि विधी व न्याय विभाग यांची यासंदर्भात महत्त्वाची भूमिका रा‍हील. पुरोगामी विचारांची महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेता कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असेही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी  स्पष्ट केले.                                                                                                   सरळसेवा भरती बिंदूनामावली संदर्भात झालेल्या या बैठकीस माजी लोकसभा सदस्य, माजी विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, विधी व न्याय विभागाचे सह सचिव नितीन जिवणे, उप सचिव टी.वा.करपते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर

राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …

ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *