गडचिरोली(दि.6सप्टेंबर):-गोसीखुर्द धरणांचे संपूर्ण 33 दरवाजे उघडून वैनगंगा नदिला आलेल्या कृत्रिम पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील तसेच बाकीच्या नद्या ना आलेल्या पुरामुळे गावातील शेतकऱ्यांचे धान,तुर,सोयाबीन व कापूस पिकांची हजारो कोटी रुपयांची नुकसान झाले आहे. तसेच पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरांची पडझड झालेली आहे तसेच घरातील अन्न धान्य,कपडे,साहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रवींद्रजी वासेकर यांच्या नेतृत्वाखाली वडसा तालुक्यातील कुरूड,आमगाव, सांवगी या गावांना भेट देवून पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली प्रत्यक्ष शेतकऱ्यांन सोबत संवाद साधत त्याचे महणने एकुन शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीची पिकांचे नुकसान भरपाई हेक्टरी 40 हजार रुपये तसेच सर्वे मध्ये ईलेक्ट्रिक लाईन, मोटार पंप यांचे सुद्धा सर्वे करण्याची मागणी सरकार कडे निवेदन देऊन करण्यात आले.