कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये मिळण्याच्या चर्चेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये – असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
वर्धा, जिल्हा प्रतिनिधी:- प्रति रुग्णामागे रुग्णालयाला दीड लाख रुपये मिळतात म्हणुन कोविड आजाराची रुग्णसंख्या वाढवून दाखविण्यात येत आहे. अशी चर्चा समाजमाध्यम व नागरिकांमध्ये आहे. अशा प्रकारची कोणतीही तरतुद राज्य शासनाने केलेली नाही. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रुग्णाच्या उपचाराकरीता दीड लाख रुपये देण्याचे अथवा मिळण्याचे कोणतेही निर्देश शासनाकडून नाही. वर्धा जिल्हयात 80 टक्के रुग्ण लक्ष्णविरहित असल्यामुळे त्यांना 20 पॅकेजेस मध्ये पात्र ठरत नसल्याने लाभ मिळत नाही. असे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. स्मिात हिवरे यांनी सांगितले
राज्यात कोविड १९ आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील जनता योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये कोविड १९आजाराने बाधित रूग्णास योजनेंतर्गत अंगीकृत खाजगी अथवा शासकीय रूग्णालयांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
तसेच वर्धा जिल्हयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मधील अंगीकृत असलेले कस्तुरबा रूग्णालय सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय सावंगी यांना प्रत्येक रूग्णामागे दीड लाख रूपये मिळत असुन असा एक मोठा घोटाळा होत असल्याचा गैरसमज समाजात पसरत आहे. या संबंधित खुलासा करणे योग्य असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले असल्यामुळे खालीलप्रमाणे माहिती देण्यात येत आहे.
१ मार्च ते ३१ ऑगष्ट २०२० पर्यंत वर्धा जिल्हयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना . व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मध्ये प्रत्यक्ष लाभ दिलेल्या रूग्णांची माहिती व त्यांच्या दाव्यापोटी रूग्णालयांना मंजुर झालेल्या रकमेची माहिती खालीलप्रमाणे –
रूग्णालयाचे नाव कोविड-१९ आजाराने महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजने अंतर्गत
कस्तुरबा रूग्णालय सेवाग्राम
६६७ रुग्णांवर उपचार केले यामध्ये
७२ जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार करण्यात आले
आचार्य विनोबा भावे ग्रामीण
५८६ रुग्णांवर उपचार केले
यामध्ये ४८ जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार करण्यात आले.
वर्धा जिल्हयातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने कोविड-१९ करीता केल्या जाणा-या उपाययोजनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.