Breaking News

वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांची वर्धेत बदली

Advertisements

वर्धा : राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले . वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे . प्रशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त ( मुख्यालय ) पदावर कार्यरत आहे.यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , वाशीम येथे २०१६ पोलीस अधिक्षक म्हणुन कार्यभार सांभाळला . पुर्व विदर्भात पाच जिल्यांचे तर पश्चिम विदर्भात दोन जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांच्या पदस्थापनेचे आदेश पारित झाले.पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे सह अनेक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पदस्थापनेचे आदेश काढण्यात येणार आहे .

Advertisements

About Vishwbharat

Check Also

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *