Breaking News

देशातील विरोधी पक्षाच्या सरकारांना त्रास देणें हा भाजपचा अजेंडा – अनंत गुढे

Advertisements

वर्धा : कालचा दिवस हा महाराष्ट्रातील राजकीय वादाचा दिवस होता. महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिह कोशारी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजपा सरकारच्या अजेंड्यावर काम केले.
केंद्रातील भाजप सरकारचा हा प्रमुख अजेंडा आहे.की राज्यातील विरोधी सरकारांना सतत त्रास देणें, काम करू न देणे, कोणत्याही कारणावरून स्वतः च्या अधिकाराचा गैर मार्गाने वापर करून सतत राज्यात वाद निर्माण करणे हा प्रयत्न असतो. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान येथेही भाजपनी असेच कारस्थाने रचून जनतेच्या कामात अडथळे निर्माण केल्याचे या देशातील १३० कोटी जनतेने अनुभवले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला २०१४ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. भाजपाचा सुफडा साफ झाला. पण केंद्रात भाजपाचे सरकार. त्यानी उप राज्यपालांचे मदतीने केजरीवाल सरकारला सळो की पळो करून सोडले. पण झाले काय ?, तर २०१९ दिल्ली विधानसभा निवडणूकत आप पक्ष प्रचंड मताने जिकून त्यानी पुन्हा सरकार स्थापन केले.
२०१४ साली केंद्रात मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वाखाली सरकार आले. तेव्हा मा. प्रधानमंत्रांनी “कॉग्रेस मुक्त भारताची ” घोषणा केली होती. परंतु अजूनही देशातून काँग्रेस हद्दपार झाली नाही.केंद्र सरकारात शिवसेना भाजप सोबत होती. शिवसेनेचे १८ खासदार असूनही केवळ एक
मंत्रिपद आणि तेही बिनकामाचे शिवसेनेच्या वाट्याला आले. महाराष्ट्रात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्ष्याचा बाहेरून पाठींबा घेतला. नंतर शिवसेना सरकारात सामील झाली. तेव्हा शिवसेनेला दुय्यम दर्जाची खाती दिली.तर पाच वर्षे सतत त्रास दिला. हि भाजपची राजकीय निती आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मला स्वतःला ही युती आवडली नाही. पण भाजपा च्या त्रासदायक वागणुकीने शिवसेनेला हा निर्णय घ्यावा लागला.मध्यप्रदेश सरकार पडले, राजस्थानात सरकार पाडण्याचे प्रयोग झाले.महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून स्थिर कसे?,आमचे १०५ आमदार असताना आम्ही विरोधी पक्षात? या प्रश्नाने भाजपाला ग्रासले आहे. आणी म्हणूनच रोज नवनवीन प्रश्न निर्माण करून शिवसेनेला त्रास देणे सुरू आहे.
सुशांतसिंग राजपुत प्रकरणाला हवा देण्यात आली. कंगनाला रात्रीतून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देऊन खेळ खेळल्या गेला. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली सी.बी.आय.,एन.सि. बी, यांचा वापर केला गेला. राज्यपाल नियुक्त विधानपरीषद १२ आमदाराची यादी रोखून ठेवली. शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्यास राजभवनावर पायघड्या टाकल्या जातात.हे सर्व महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सतत महाराष्ट्रतील जनतेसाठी काम करीत आहेत.अत्यंत संयमी, शांतपणे ते सरकार चालवीत आहेत.पण यामुळे केंद्र सरकारचीच नाचक्की होत आहे. एन डी ए सोबत असणारे अनेक पक्ष भाजपा पासून दूर जात आहे.उत्तर प्रदेशातील महिलांच्या वेदनेने संपुर्ण देश हादरून गेला आहे. काल तीन तरुणीवर अँसिड हल्ला झाला. हे प्रकरण जर महाराष्ट्रत झाले असते तर मा.राज्यपाल रस्त्यावर उतरले असते काय? उत्तरप्रदेश, बिहार येथे महिलांवर होणारा अत्याचार भक्तांना दिसत नाही काय?जेव्हा मंदिर उघडी होती, तेव्हा आम्ही देवाला किती त्रास दिला. रात्री तीन वाजता भगवान तिरूपती चे दर्शन, शिर्डी, शेगाव, मुंबई चे श्री सिद्धिविनायक, लालबागचा महाराजा पण आज मंदिर बंद ठेवणे हे महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.आता देवाला आराम करू देण्याची वेळ आहे. आता कुठे कोरोनातून महाराष्ट्र सावरतो आहे.मा.मुख्यमंत्री यांनी कोव्हीड 19 ची परिस्थिती अत्यंत प्रामाणीकपणे हाताळली आहे.जागतिक स्तरावर त्याचे कॊतुक झाले आहे.जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे.जनतेने संयम ठेवावा.सर्व आता सुरू होण्याच्या स्थितीत आहे.साईबाबा ची शिकवण”श्रद्धा आणि सबुरी” ठेवा.
अनंत गुढे, माजी खा.
शिवसेना संपर्क प्रमुख,
वर्धा जिल्हा.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *