Breaking News

पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई ( प्रतिनिधी )

पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून मदत करण्यात आली.

कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले.या खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या तसेच नातेवाईक उपस्थित नसलेल्या पत्रकार बांधवांचे चेक पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधी कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार स्व.जयंत करजवकर , News 18 लोकमतच्या मुंबई कार्यालयात काम करणारे पत्रकार स्व.विठ्ठल मांजरेकर , तसेच संभाजीनगर येथील सामनाचे पत्रकार स्व. राहुल डोलारे यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली.

यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे, उपाध्यक्ष श्री दीपक भातुसे, माजी कार्यवाह श्री प्रमोद डोईफोडे, श्री सोनू श्रीवास्तव तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी श्री मयुरेश गणपते, श्री राजू सोनवणे आदि उपस्थित होते.तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे हे देखील उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

पहलगाम आतंकी हमले पर काँग्रेस विधायकों के बिगड़े बोल

पहलगाम आतंकी हमले पर काँग्रेस विधायकों के बिगड़े बोल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *