Breaking News

मानव पृथ्वीचा मालक नव्हे तर सेवक – विवेक भीमनवार : बहारच्या पक्षीसूची प्रकाशनाने पक्षीसप्ताहाची सुरुवात – वनविभागाचा सहभाग 

Advertisements

वर्धा – मानवाने आपण सर्वश्रेष्ठ आहोत ही भावना न जोपासता पर्यावरणातील वन्यजीव, पशू, पक्षी, कीटक, वनस्पती आणि निसर्गातील सर्व घटकांसोबत सहजीवनाचा विचार केला तरच पृथ्वीचे अस्तित्व आल्हाददायक राहील. स्वतःला पृथ्वीचा मालक न समजता सेवक समजले तर पर्यावरण टिकून राहील, असे उद्गार जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पक्षीसप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले. या कार्यक्रमात बहार नेचर फाउंडेशनद्वारे संपादित करण्यात आलेल्या जिल्हा पक्षी सूचीचे प्रकाशन भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर, बहारचे सचिव दिलीप वीरखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
दि. ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र पक्षीसप्ताह साजरा केला जात असून बहार नेचर फाउंडेशनद्वारे व वन विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ जिल्हा पक्षी सूची पुस्तिका व ई पुस्तिका प्रकाशनाने करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ३०३ पक्ष्यांचा या सूचीत समावेश करण्यात आला असून वन विभागाद्वारे ही पक्षी सूची प्रकाशित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात फुलपाखरू उद्यान, जीवाश्म संग्रहालय, पक्षीचित्र प्रदर्शनी, नीलपंख या शहरपक्ष्याच्या शिल्प परिसराचे सौंदर्यीकरण आदी विषयांवरही मांडणी करण्यात आली. पर्यावरणाचा, जैवविविधतेचा ऱ्हास थांबविण्यासाठी सामाजिक चळवळींचे मोठे योगदान आहे. याच निस्वार्थ भावनेतून कार्यरत असणारी बहार नेचर फाउंडेशन ही संस्था भविष्यात राज्यस्तरावरील मार्गदर्शक संस्था ठरावी, अशी सदिच्छाही विवेक भीमनवार यांनी व्यक्त केली. प्रकाशन सोहळ्यात सुनील शर्मा, किशोर वानखडे यांनीही पक्षीसप्ताहानिमित्त भूमिका मांडली.  
कार्यक्रमाचे संचालन दिलीप वीरखडे यांनी केले. कार्यक्रमाला बहारचे वैभव देशमुख, राहुल तेलरांधे, दीपक गुढेकर, जयंत सबाने, दर्शन दुधाने, सुभाष मुडे, अनिल देवतळे यांची उपस्थिती होती. 

Advertisements

——————————————————

Advertisements

*जिल्ह्यातील पाणस्थळांवर पक्षीनिरीक्षण उपक्रम*
पक्षीसप्ताहानिमित्त बहार नेचर फाउंडेशनद्वारे दि. १० रोजी पोथरा प्रकल्प, दि. ११ रोजी दिग्रस तलाव आणि दि. १२ ला मदन तलावावर सकाळी सात ते नऊ या कालावधीत पक्षिनिरीक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर निसर्ग अभ्यासक दिवंगत उल्हास राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बहार व महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले पक्षीअभ्यासक व संशोधक पक्षीविश्वाशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधणार आहेत. बहारच्या फेसबुक पेजवर निसर्गप्रेमींना या व्याख्यानांचा लाभ घेता येईल. पक्षीसप्ताहाचा समारोप वन विभागाच्या सहकार्याने मदन तलावावर करण्यात येईल. 

Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *