मास्क नाही तर प्रवेश नाही’ प्रत्येक व्यापारी आस्थापनेने मोहीम राबवावी: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचे संकेत

चंद्रपूर दि.6 नोव्हेंबर: जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण पुर्वीपेक्षा थोडे कमी झाले असले तरी कोरोना अद्याप संपलेला नाही, येत्या काही दिवसात सणासुदीमुळे बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी प्रतिष्ठान व बाजाराच्या ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षीत अंतर राखणे यासारख्या कोरोना प्रतिबंधंक उपाययोजनांबाबत जनजागृती वाढविण्यासाठी व्यापारी वर्गाचे सहकार्य महत्वाचे असल्याने प्रत्येक दुकाणात व आस्थापनेत ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ ही मोहिम राबविण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावास आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी, व्यापारी संघटना व संबंधीतांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून नागरिकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती करण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी ग्राहक तसेच दुकानदारांना कोरोनापासून बचावाची काळजी घेणे आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत मास्क न लावता आलेल्या ग्राहकांना वस्तु विक्री करू नये असे सांगितले. सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानात मास्क विक्रीसाठी ठेवावे. विना मास्क येणाऱ्या ग्राहकांना सर्वप्रथम मास्क देवून त्याचे माफक शुल्क आकारण्यात यावे, अशी प्रणाली कार्यान्वीत केल्यास दुकानदार व नागरिक यांना सोयीचे होईल असेही त्यांनी सांगितले.

ज्या आस्थापनेत ग्राहक दुकानाच्या आतमध्ये येतात तिथे प्रत्येक दुकानमालकाने ग्राहकांकरिता हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर, शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण मोजण्यासाठी पल्स ऑक्सीमीटर व शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्किनींग मशीन ठेवणे आवश्यक राहील असे सांगीतले. तसेच प्रत्येक ग्राहकाची नोंद संपर्क क्रमांकासह नोंदवहीत ठेवण्यात यावी जेणेकरून संबंधीत ग्राहक बाधीत झाल्याचे आढळून आल्यास कॉन्टक्ट ट्रेसींग करून संपर्कात आलेल्यांना वेळीच उपचाराकरिता सूचित करता येईल. दुकाणांसमोर ठरावीक अंतरावर वर्तूळ आखणी करून प्रवेश संख्या मर्यादीत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.नियमांचे पालन न केल्यास दंड आकारणीसह फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी दिला.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *