Breaking News

कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षेसाठी एसओपी, औरंगाबाद येथील घटनेनंतर सरकारचा निर्णय

Advertisements

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

Advertisements

औरंगाबाद शहरातल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीयार्ने दखल घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे.

Advertisements

त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या कोविड सेंटरवर रोजच्या रोज महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांना आपण चार वेळा पत्रे लिहून कोविड सेंटरसाठी एसओपी तयार करावी, अशी विनंती केली. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. ही एसओपी तातडीने लागू करावी, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर अजित पवार यांनी या महिनाअखेरपर्यंत एसओपी तयार करण्याचे आश्वासन दिले.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *