Advertisements
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारला प्रवासी निवारा
वर्धापन दिनानिमित्त आदर्श उपक्रम

वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे आनंद निकेतन विद्यालय,महाविद्यालय,कृषी विद्यालय येथे बाहेर गावातून शिकायला येतात तसेच बाहेर गावी जाणारे प्रवासी देखील याच ठिकाणी बस ची प्रतीक्षा करीत असतात .बस ने प्रवास करत असताना बस ची प्रतीक्षा करीत विद्यार्थी ,प्रवासी उन्हात उभे असतात.मागील काही महिन्याआधी आनंदवन चौक कडून नागपूर जाणाऱ्या दिशेला असलेला प्रवासी निवारा एका अपघातात पडला त्यानंतर कोणीही त्या प्रवासी निवाऱ्याकडे लक्ष दिले नाही.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही समस्या लक्षात येताच त्यावर उपाय म्हणून त्यांनी प्रवासी निवारा उभारण्याचे ठरवले .वरोरा तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत बदकी,कल्पक ढोरे ,सचिन मांडवकर , विशाल यादव,तुषार कळसकर व नितीन सुरसे या महाराष्ट्र सैनिकांनी या निवारा तयार केला.या प्रवासी निवाऱ्यामुळे या मार्गाने जाणारे प्रवासी शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध यांना सावली मिळणार आहे .जे काम प्रशासनाने केलं नाही ते काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा ही कायम जनतेच्या सेवेसाठी कोणत्याही स्वार्थविना काम करत राहील असे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी ना सांगितले.
Advertisements