चंद्रपूर – सरदार पटेल महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागप्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठाच्या संगणकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. किशोर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाईन हिवाळी २०२० परीक्षा प्रक्रिया ही कोणत्या माध्यमाद्रारे देऊ शकता, तसेच आभासी परीक्षा देताना इंटरनेटची स्पीड किती हवी, सराव (Mock) परीक्षा कशी दयायची, हॉल तिकीट कसे डाऊनलोड करायचे याबाबत एकूण ६ विविध व महत्वपूर्ण व्हिडीओ आभासी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपूर्ण पुढाकार घेऊन तसेच सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण आव्हान स्विकारुन कार्य केले. गोंडवाना विद्यार्थ्यांसाठी ते व्हिडीओ महत्वपूर्ण ठरले आहेत.
ऑनलाइन परिक्षेकरिता डॉ किशोर यांचे स्वयंपूर्ण जागृत व्हीडिओज विद्यार्थ्यांसाठी ठरले महत्वपूर्ण
ऑनलाइन परिक्षेकरिता डॉ किशोर यांचे स्वयंपूर्ण जागृत व्हीडिओज…
गोंडवाना च्या विद्यार्थ्यांसाठी ठरले महत्वपूर्ण
याआधी कोव्हीड-१९ मध्ये, उन्हाळी-२०२० गोंडवाना विद्यापीठाद्रारे प्रथम परीक्षा ऑनलाइन घेताना अनेक अडचणी आल्या.विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. तेव्हा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. वरखेडी यांनी उन्हाळी-२०२० ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी डॉ. एस. बी. किशोर यांची गोंडवाना विद्यापीठाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली. डॉ किशोर यानी तयार करून दिलेल्या मार्गदर्शनानुसार उन्हाळी २०२० परीक्षा गोंडवाना विद्यापिठाद्वारे यशस्वरित्या पार पाडली, हे विशेष. यासंबधी डॉ. एस. बी. किशोर यांना कुलगुरू एस. वरखेडी यांनी परीक्षेसंबधी मोलाचे मार्गदर्शन केल्याबाबत कौतुकाचे पत्र त्यांना पाठविले.
करोनाच्या भीषण संकटात नवे-नवे तंत्र शिकण्याचे व शिकविण्याचे मंत्र शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अवगत असावे यासाठी डॉ. एस. बी. किशोर यांनी कोव्हीड या काळात प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्यापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे तब्बल १२८ व्हिडिओ बनवले आहे तसेच त्यांनी विविध वेबिनार मधुन प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी योग्य ते मार्गदर्शन केले. त्याचा मोठा सकारात्मक परिणाम प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. त्यांच्या या अमूल्य योगदानासाठी त्यांना नुकतेच ‘इंटरनॅशनल एज्युकेशन सिम्पोझीयम’ या संस्थेचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘बेस्ट फॅकल्टी डेव्हलपमेंट फॉर ऑनलाइन टिचिंग ड्यूरिंग कोव्हीड-१९’ चा पुरस्कार मिळाला आहे. तसेच नुकतीच सुरू असलेल्या हिवाळी-२०२० या परीक्षेदरम्यान कित्येक विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या विविध समस्या मोबाइलद्वारे डॉ. किशोर यानी विशेष मेहनत घेऊन वेळेवर त्यांचे प्रश्न सोडेविले.
बहुआयामीय व सदैव तत्पर असणारे डॉ किशोर, हे कंप्यूटर बोर्ड मध्ये सगळ्यात कमी ‘अप्रूवल मेबर्स’ असून सुद्धया, एकूण १० कोर्सेजचे जवळपास १२० पेपरचे सिलेब्स, पेपर सेटिंग व मॉडरेशन चे काम अगदी योग्यरित्या मागील ८ वर्षापासून हाताळत आहेत.
डॉ. एस. बी. किशोर यांनी संगणकशास्त्र व व्यवस्थापन या दोन विषयात आचार्य पदवी घेतली आहे. त्यांनी संगणकशास्त्र व व्यवस्थापन या विषयांमध्ये १११ पुस्तके लिहिली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ विद्यार्थांना आचार्य प्राप्त झाली आहे.
त्यांना यापूर्वी शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी प्रामुख्याने नागपूर विद्यापीठाचा ‘बेस्ट टीचर अवार्ड-२०१२’ व गोंडवाना विद्यापीठाचा ‘बेस्ट टीचर अवार्ड-२०१६’ सह प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत हे विशेष.