Breaking News

चिमुकल्यांकडून “चिमणी दिन” उत्साहात साजरा.

Advertisements
कोरपना (ता.प्र.):-
      गडचांदूर वार्ड क्रमांक ५ येथील ओम बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या चिमुकल्यांनी २० मार्च रोजी “जागतिक चिमणी दिन” साजरा केला. सध्याच्या काळात चिमण्या लुप्त होण्याच्या मार्गावर आसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणं महत्वाचे असून आपला जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रमनिय करण्यासाठी तसेच आपल्या किलबिलाटाने आयुष्याचा भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व,वैभव जपणे गरजेचं आहे.
   सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर तर त्यातील अनेक जाती इतिहास जमा झाल्या आहे.जगभरात अंदाजे २६ जातींच्या चिमण्यांची नोंद असल्याची माहिती असून यापैकी फक्त २३ चिमण्यांचे छायाचित्र सध्या उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे.उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून चिमुकल्यांनी  वृक्षाला पाण्याच्या बाटल्या लावून तहानलेल्या चिमण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली आहे.या कौतुकास्पद उपक्रमात मंडळाचे संघटक महेश देरकर सह अभिषेक जोगी,रवी श्रीसागर,विष्णू देरकर,ब्रह्मा देरकर,ऋषी चटप, अंकुश नागभीडकर,निशांत धांडे,प्रितेश उलमाले,सागर मसे यांनी परी,सुर्या,अवनी, अभिनव,माही या बालकांना सहयोग केला. तसेच इतर पक्षी प्रेमी व पर्यावरण प्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.प्रत्येकांनी चिमण्यांसाठी आपापल्या घरांवर पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती वजा आवाहन पक्षीय प्रेमींनी “दै.चंद्रधून” च्या माध्यमातून केले आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *