भद्रावती-
गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून करुण अंत झाल्याची घटना भद्रावती पोलिस ठाणे अंतर्गत बेलोरा (किलोनी) या गावात सोमवार, 22 मार्च रोजी उघडकीस आली.
तालुक्यातील बेलोरा (किलोनी) येथील रहिवासी पराग बंडू गाडगे (22) हा युवक 19 मार्चपासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. हा युवक भद्रावतीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेत होता. दरम्यान, 19 तारखेला आपले प्रशिक्षण आटोपून तो सरळ शेतात गेला. त्यावेळी तो डागा खाण कंपनीने उत्खनन केलेल्या खड्डयामध्ये सायंकाळी 5 वाजेच्यादरम्यान स्वतःच्या मालकीच्या गुरांना पाणी पाजताना तोल जाऊन पाण्यात पडल्यामुळे बुडाला.
दरम्यान मुलगा घरी न परतल्यावर घरच्यांनी जवळपास दोन ते तीन दिवस शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. दरम्यान 22 मार्चला गावातील नागरिक याच खड्डयावर गेले असता मृतदेह तरंगताना दिसून आला. याची माहिती भद्रावती पोलिस ठाण्याला तात्काळ देण्यात आली. पोलिसांनी घटनेची दखल घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Check Also
नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!
नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …
नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …