Breaking News

बल्लारपूर तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

बल्लारपूर तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन
दुरध्वणी क्रमांक 07172-241398 यावर मिळेल तालुक्याशी संबंधीत माहिती

चंद्रपूर,  : तहसिल कार्यालय बल्लारपूर येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे निर्देशावरून सर्वकश नियंत्रण कक्ष 17 मार्च 2021 पासुन कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तालुक्यातील जनतेला बल्लारपुर तालुक्याशी संबंधीत विविध माहिती नियंत्रण कक्षातील दुरध्वणी क्रमांक 07172-241398 या एकाच क्रमांकावर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तालुका नियंत्रण कक्षाद्वारे तालुक्यातील पर्जन्यमानाची दैनंदिन माहिती, तालुक्यात घडणारे मानवनिर्मित व नैसर्गीक आपत्तीची, रस्ते अपघात इ. माहीती तसेच कोविड -19 च्या अनुषंगाने तालुक्यातील कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये व त्यामध्ये उपलब्ध खाटांची संख्या, गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरण याबाबत शासनाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश व नियमावली, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टिमची माहीती, कोविड -19 चे लसीकरण केंद्रांची माहिती अद्यावत ठेवण्यात येईल.
आग लागल्यावर नियंत्रण कार्यवाही, पुरपरिस्थितीत करावयाची कार्यवाही, रस्ते अपघात ( मोठया तिव्रतेचे ) घडल्यास करावयाची कार्यवाही तालुका नियंत्रण कक्षात ठेवण्यात येईल. तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची नावे व संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते, अग्निशमन विभाग असणाऱ्या शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापनांची नावे, संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते, तालुक्यातील शासकीय /खाजगी रुग्णालये / प्राथमीक आरोग्य केंद्र येथील संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते, बोटचालक, क्रेनचालक, नदीत पट्टीचे पोहणारे यांची नावे इ. अद्ययावत माहिती नियंत्रण कक्षात राहील.
मान्सुन काळात पाण्याखाली जाणा-या पुलांची माहिती, तालुका स्तरावरील शोध व बचाव पथकातील सदस्य, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांची अद्ययावत माहीती नियंत्रण कक्षात उपलब्ध राहणार असल्याचे तहसिलदार संजय राईंचवार यांनी कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *