पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा
चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दिनांक 3 एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी स. 11.30 वा. कच्चेपार ता. सिंदेवाही येथे नागपूरहुन आगमन व वनविभाग ब्रम्हपुरी द्वारा आयोजित वनसफारी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12.15 वा. कच्चेपार येथुन सिंदेवाहीकडे प्रयाण. दु. 12.30 वा. विश्रामगृह सिंदेवाही येथे आगमन व राखीव. दु. 12.50 वा. सिंदेवाही तालुक्यातील विकास कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची पंचायत समिती सभागृह येथे आढावा बैठक. दु.2.30 वा. नगरपंचायत सिंदेवाहीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या बाजार ओट्याचे बांधकाम, स्मशानभूमीचे बांधकाम व खुल्या जागेचे सौंदर्यीकरण या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाला टेकडी रोड, आठवडी बाजाराची जागा येथे उपस्थित. दु. 3.15 वा. देवराव ठाकरे प्रभाग क्रमांक 14 यांचेकडे भेट. सायं. 4 वा. सिंदेवाही येथून ब्रम्हपुरीकडे प्रयाण. सायं. 5 वा ब्रम्हपुरी विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 5.40 वा. स्थानिक पदाधिकारी समवेत चर्चा. रात्री विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे मुक्काम.
रविवार दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. नगरपरिषद ब्रम्हपुरीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ई-लायब्ररीचे भूमिपूजन कार्यक्रमास तहसील कार्यालयाजवळ उपस्थिती. स. 11 वा. ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे बैठक. दु. 12.30 वा. आवळगावकडे प्रयाण. दु.12.40 वा. आवळगाव येथे आगमन व श्री. खोकले व श्री. निखुरे यांचेकडे सांत्वनापर भेट. दु. 1 वा. हळदा येथे आगमन व श्री. आवारी यांचेकडे सांत्वनापर भेट. दु. 1.20 वा. वांद्रा येथे आगमन व वांद्रा पोचमार्ग व समाज मंदिर बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित. दु.2.30 वा. शासकीय विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे आगमन व राखीव. सायं. 5 वा. ब्रम्हपुरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण.
सोमवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा. चंद्रपूर येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोवीड-19 संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक. स. 11.30 वा. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या व सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामासंदर्भात वीस कलमी सभागृहात आढावा बैठक. दु. 1.30 ते 2 राखीव. दु.2 वा. नियोजन भवन येथे वनविभागाची आढावा बैठक. दु.2.45 वा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, पारेषण व निर्मिती या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक. दु.3.30 वा. रामाळा तलावाची पाहणी. सायं 4 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतींच्या बांधकामाची पाहणी व आढावा बैठकीस नवीन प्रशासकीय इमारत, विजय नगर बायपास रोड, चंद्रपूर येथे उपस्थित. सायं. 5 वा. स्त्री रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर येथील कोवीड-19 सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर येथे पत्रकार परिषद. सायं. 6.30 वा. अॅड. जयंत साळवे यांचेकडे सांत्वनापर भेट. सायं. 7 वा. हिराई विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदुषण लक्षात घेता पर्यावरण विभागासह संबंधित विभागाची नियोजन भवन येथे आढावा बैठक. स. 11 वा. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. स. 11.30 वा. चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी विभागाची आढावा बैठक. दु. 12 वा. केपीसीएल बरांज मोकासा येथील प्रकल्प ग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 12.30 वा. चंद्रपूर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 1 वा. मानव विकास योजनेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 1.30 ते 2.30 राखीव. दु. 2.30 वा. पदाधिकारी समवेत चर्चा. दु. 3.30 वा. चंद्रपूरहुन नागपूर कडे प्रयाण.