Breaking News

पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करा, इरई धरणावर बंधारा बांधण्याच्या आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करा,

इरई धरणावर बंधारा बांधण्याच्या आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना
चंद्रपूर-
चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या इरई धरणातील पाण्याची पातळी कमी होत चालली असून, यासंदर्भात त्वरित योग्य नियोजन केले पाहिजे. तसे केले नाही तर मे महिन्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, ही बाब लक्षात घेता त्वरित प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

या विषयासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी 16 एप्रिल रोजी आभासी बैठक घेतली व चर्चा केली. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवाणी, मजीप्राचे अधिकारी आदींची आभासी पद्धतीने उपस्थित होते.
इरई नदीवर बंधारा बांधण्यासाठी व त्यामाध्यमातून पाण्याची साठवणूक करण्यासाठी महानगरपालिकेने त्वरित अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना आ. मुगंटीवार यांनी आयुक्तांना दिल्या. विहिरी व बोअरींगच्या पाण्याची तपासणी करून पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याबाबतचे फलक जलस्त्रोतांशेजारी लावण्याच्या सुचनासुद्धा त्यांनी यावेळी दिल्या. सार्वजनिक ठिकाणच्या बोअरिंग्ज जवळ ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ ची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
एप्रिल महिन्याच्या मध्यात आपण आलो असून, उन्हाळी झळा तापायला लागल्या असताना पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होवू नये म्हणून याविषयासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्याच्या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. आ. मुनगंटीवार यांच्या सुचनांच्या अनुषंगाने या विषयाबाबत सर्व आवश्यक बाबी तपासून कार्यवाही करण्यात येईल तसेच महानगरातील पाणी टंचाईचा आराखडा शासनाकडे पाठवून त्यासाठी निधीची मागणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *