Breaking News

जिल्ह्यातील सिमेंट, पॉवर,  पेपर अशा प्रमुख उद्योगांनी  ऑक्सिजन प्लांट उभारावे – हंसराज अहीर

Advertisements

*जिल्ह्यातील सिमेंट, पॉवर,  पेपर अशा प्रमुख उद्योगांनी
 ऑक्सिजन प्लांट उभारावे – हंसराज अहीर*
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिमेंट, पॉवर, स्टील, मॅगनीज व अन्य वस्तू उत्पादन कंपन्या वास्तव्यास आहे.  परिसरातील नागरिकांच्या  मदतीने या सगड्या उद्योगाने आपआपल्या क्षेत्रात यश संपादन केले आहे. जनतेच्या सहकार्याने आणि शांततेच्या वातावरणात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर  यांनी  कोरोना संकटात जिल्ह्यातील संपूर्ण उद्योगांना आपल्या सेवेच्या भूमिकेत एक पाऊल पुढे टाकून कार्य हाती घेण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील सिमेंट उत्पादक कंपन्या अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, एसीसी सिमेंट, दालमिया भारत सिमेंट, माणिकगढ सिमेंट व पॉवर उत्पादक कंपन्या धारिवाल, वर्धा पॉवर,  जीएमआर व अन्य उत्पाद उत्पादक कंपन्या गोपाणी आयरन, लॉयड्स मेटल, चमन मेटॅलिक्स व चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट तसेच चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन या संपूर्ण उद्योगाने जिल्ह्यातील कोरोना संकट पाहता आपल्या विशेष फंडातून आपआपले स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारावे जेणेकरून जिल्ह्या करिता ऑक्सिजन ची गरज पूर्ण होईल. आपल्या जिल्ह्यातील जनतेसाठी एक पाऊल पुढे करून मदतीला यावे अशी विनंती हंसराज अहिर यांनी केली.
तसेच उद्योगांनी आपआपल्या उद्योग परिसरातील गावात, तालुक्यात कोरोना केअर सेंटर (CCC ) ची उभारणी सीएसआर फंडातून करावी यातून  नागरिकांची सेवा सुद्धा होईल असे हंसराज अहिर यांनी सर्व उद्योगांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलिचे सीएमडी यांचेशी झालेल्या चर्चेत वेकोलिने ३ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *