Breaking News

जिल्हधिकारी अजय गुल्हाणे यांची विविध कोविड केअर सेंटरला भेट,ऑक्सीजन बेड वाढविण्याचे दिले निर्देश

Advertisements

जिल्हधिकारी अजय गुल्हाणे यांची विविध कोविड केअर सेंटरला भेट

Advertisements

बल्लारपूरभिवकुंडजिल्हा स्री रूग्णालय,

Advertisements

आसरा व वन अकादमी मध्ये केली पाहणी

Ø  ऑक्सीजन बेड वाढविण्याचे दिले निर्देश

 चंद्रपूर दि.5 मे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यांनी आज चंद्रपूर शहरातील जिल्हा स्री रूग्णालय, महानगरपालीकेच्या आसरा व वन अकादमी येथे तसेच काल बल्लारपूर, विसारपूर व कळमना येथील येथील कोविड केअर सेंटरला व रूग्णालयास भेट देवून उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर ठिकाणी कोविड रूग्णांसाठी पुरेसे औषधसाठा, जेवणाची व्यवस्था व इतर सुविधांची पाहणी करून रूग्णांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्याचे तसेच जिल्हा स्री रूग्णालय व वन अकादमी येथे येथे ऑक्सीजन बेड वाढविण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी यांनी काल  बल्लारपूर तालुक्यातील मौजा भिवकुंड येथिल सामाजीक न्याय विभागाच्या मुलींच्या वस्तीगृह  सुरु असलेले कोविड केअर सेंटर येथे तसेच तालुका क्रिडा संकुल, विसापूर व सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे वस्तीगृह येथील प्रस्तावित कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर आणि प्राथमिक आरोग्य केंन्द्र कळमना येथील संपुर्ण इमारतीची पाहणी केली व ग्रामिण रुग्णालय येथील प्रस्तावित उपजिल्हा कोविड रुग्णालय (DCHC) च्या संबधाने उपस्थित सर्व अधिकाऱ्यांकडुन माहिती जाणुन घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी संजय डव्हळे, तहसिलदार संजय राईंचवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गजानन मेश्राम, नगरपरिषदेचे मुख्यधिकारी विजय सरनाईक, उपविभागीय अभियंता नितीन मुत्तेलवार, संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे व प्रभारी ठाणेदार श्री. मुलाणी हे उपस्थित होते.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

रोजाना पके टमाटर खाने के 8 असामान्य फायदे?

रोजाना पके टमाटर खाने के 8 असामान्य फायदे? डॉ. निकिता तोशी की समीक्षा टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *