Breaking News

लग्न न करताच झाली आई; टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

Advertisements

Birthday special:

अवघ्या १५ वर्षांची असतानाच एकता कपूरने सिनेनिर्मितीत पाऊल टाकलं.

टेलिव्हिजनची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयातच एकताने मालिका आणि सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होते. आजवर अनेक मालिकांची निर्मिती करत एकताने टेलिव्हजन क्षेत्रात तिचं वर्चस्व निर्माण केलंय. मालिकाच नाही तर सिनेमा आणि वेब सीरिजच्या निर्मितीतूनही तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. एकता कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

Advertisements

एकता कपूर ही दिग्गज अभिनेते जितेंद्र यांची मुलगी असून एकताचा जन्म ७ जून १९७५ला झाला होता. एकता ४६ वर्षांची झाली असून ती अजूनही सिंगल आहे. एकताला रवि हा मुलगा आहे. सरोगसीच्या मदतीने २७ जानेवारी २०१९ला रविचा जन्म झाला. एकता सिंगल मदर असून मुलाचा सांभाळ करतेय. आपल्या मुलासोबतचे अनेक फोटो एकता सोशल मीडियावर शेअर करत असते.

Advertisements

अवघ्या १५व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात

अवघ्या १५ वर्षांची असतानाच एकता कपूरने सिनेनिर्मितीत पाऊल टाकलं. कमी वयातच एकताला निर्मिती क्षेत्रात काम करण्याची रुची निर्माण झाली होती. यासाठी तिला वडील जितेंद्र यांनी साथ दिली. १९९५ साली एकताने ‘हम पांच’ , ‘पड़ोसन’, ‘कॅप्टन हाउस’ आणि ‘मानो या न मानो’ या मालिकांची निर्मिती केली होती. यानंतर एकताने कन्यादान, घर एक मंदिर, क्योंकि सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कुसुम, कसौटी जिंदगी की, पवित्र रिश्ता, बड़े अच्छे लगते हैं अशा अनेक सुपरहीट मालिकांची निर्मिती केली. एकता कपूरच्या मालिकांना चाहत्यांची कायम पसंती मिळाली.

यानंतर एकताने डिजिटल विश्वातही तिची जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. अल्ट बालाजी या प्रॉडक्शन कंपनीच्या बॅनरखाली एकता अनेक वेब सीरिज आणि सिनेमांची निर्मिती केली. या वेब सीरीज आणि सिनेमांनी ओटीटीवर धुमाकुळ घातला.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

मनीषा कोईराला ‘ओरल सेक्स सीन’ने घाबरली

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’या सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने मल्लिकाजान ही भूमिका साकारली आहे. …

शरद पवार के सामने इस एक्ट्रेस ने दिया जोरदार भाषण, हर तरफ हो रही चर्चा

शरद पवार के सामने इस एक्ट्रेस ने दिया जोरदार भाषण, हर तरफ हो रही चर्चा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *