Breaking News

Vishwbharat

कृषी संजीवनी मोहीम,बोरीनवेगाव येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन.

कृषी संजीवनी मोहीम,बोरीनवेगाव येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील बोरीनवेगाव येथे कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत पिक स्पर्धा रब्बी हंगाम २०२०,२१ अंतर्गत विभागीय स्तर प्रथम क्रं.रामचंद्र हिरामण कुळमेथे,कृषी सहायक बी. एल.तिडके व भाजीपाला उत्पादक हबीब शेख यांचा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी रविंद्र ढमाळे,कृषी सहायक कोकणे मॅडम,बी.जी.बेवनाळे,डी.बी.भगत,डीयू कुळमेथे,हबीब शेख,साईनाथ कुंभारे,पत्रकार शंकर …

Read More »

महापौर राखी कंचर्लावार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन

महापौर राखी कंचर्लावार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे कार्यकर्तृत्व सांगणाऱ्या ‘संकल्पपूर्ती’ पुस्तिकेचे मंगळवारी (ता. 29) साईसुमन निवासस्थानी त्यांच्या जन्मदिनानिमित्त विमोचन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते प्रमोद कडू, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती …

Read More »

ग्रीन जिम, खेळणी, सौंदर्यीकरणाला मंजुरी

ग्रीन जिम, खेळणी, सौंदर्यीकरणाला मंजुरी चंद्रपूर, ता. 30 : महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या प्रभागामध्ये ग्रीन जिम, खेळणी, ओपणस्पेसला सुरक्षा भिंत करणे, ओपनस्पेसचे सौंदर्गीकरण करण्याच्या कामाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात मंगळवारी (ता. २९) महिला व बालकल्याण समितीची बैठक पार पडली. यावेळी सभापती चंद्रकला सोयाम, उपसभापती पुष्पाताई उराडे, समिती सदस्य मंगला आखरे, …

Read More »

हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज, 1 जुलैपासून आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहिम

हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज 1 जुलैपासून आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहिम चंद्रपूर दि. 30 जून : राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 1 ते 15 जुलै 2021 या कालावधीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीरोग दूरीकरणाकरीता सार्वत्रिक औषधोपचार विशेष मोहिम संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे. हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या …

Read More »

लकमंपात्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर , विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन

लकमंपात्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर Ø विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन चंद्रपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. 1 जुलै 2021 रोजी, सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता आयटीआय परिसर येथे …

Read More »

मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद Ø शेतक-यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन चंद्रपूर दि. 30 जून : खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडत आहे. दि. 1 जुलै 2021 रोजी …

Read More »

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज योजना

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज योजना चंद्रपूर दि. 30 जून : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वतःचा उद्योग, सेवा उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सन 2021-22 या वर्षाकरीता जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ग्रामीण व शहरी भागात सुधारीत बीज भांडवल कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सुधारीत बिज भांडवल कर्ज योजना: पात्रता: अर्जदार कमीत कमी 7 …

Read More »

गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा!

मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा! गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले …

Read More »

कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय चंद्रपूर, मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणुचे भयावह संकट आहे. या महामारीने विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात आले नाहीत. शिवाय त्यांचे कुटुंबही आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार्‍या विविध शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी घेतला. या निर्णयाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक सत्र …

Read More »

‘तौक्ते’ वादळग्रस्तांसाठी 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर

‘तौक्ते’ वादळग्रस्तांसाठी 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर Ø मदत व पूनर्वसन मंत्री वडेट्टीवारांच्या पुढाकारामुळे दिलासा चंद्रपूर दि, 29 : राज्यातील काही जिल्ह्यांना 16 व 17 मे 2021 रोजी ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्याचे मदत व …

Read More »