Breaking News

Vishwbharat

बामसेफतर्फे कर्मचारी /अधिकारी यांचा सेवापूर्ती सत्कार ! मेंढामालचे शेतकरी यांचा बसपातर्फे गौरव

बामसेफतर्फे कर्मचारी /अधिकारी यांचा सेवापूर्ती सत्कार ! मेंढामालचे शेतकरी यांचा बसपातर्फे गौरव सिंदेवाही प्रतिनिधि सिंदेवाही – बामसेफ सिंदेवाही जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सिंदेवाहीतील विविध शासकिय-निमशासकीय विभागातील नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी /अधिकारी यांच्या सत्कारसोबतच तालुक्यातील राज्यस्तरीय क्रुषिभुषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी यांचा गौरव तसेच तालुकास्तरीय विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनां बक्षिस वितरण कार्यक्रम नुकताच सम्पन्न झाला . य़ा कार्यक्रमाची सुरवात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु …

Read More »

कोरोणा व कुष्ठरोग बाबत स्वःनिगा स्वयं जागृतीची विशेष मोहीम.” – सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा खास उपक्रम

कोरोणा व कुष्ठरोग बाबत स्वःनिगा स्वयं जागृतीची विशेष मोहीम.” – सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा खास उपक्रम नागभिड : कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे समुदायात राहणारे लाखो कुष्ठरुग्णांचे व त्यांच्या परिवाराच्या जीवनमानावर गंभीर परिणाम झाले आहे. या कोविड-19 काळात कुष्ठरुग्नांना अनगिनत आरोग्य विषयक व कौटुंबिक, सामाजिक, आर्थीक समस्यां/प्रश्न भेडसावले असुन समस्यांची शृखला अजूनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘सक्षम कुष्ठातेय स्वाभिमानी संस्था या कुष्टरुग्णाच्या …

Read More »

सृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

सृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन मनपाच्या वतीने छत्रपतीनगर येथे वृक्षारोपण चंद्रपूर, ता. १ : आईचे कर्ज जन्मभर सेवा करूनही फेडता येत नाही. मात्र, निरोगी जीवन जगायचे असेल तर वसुंधरेचे ऋण फेडले पाहिजे. सृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा, असे प्रतिपादन लोकलेखा समिती अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने एकता गणेश मंडळ, छत्रपती …

Read More »

राष्ट्रीय हत्ती रोग दुरिकरण मोहीम, सामूहिकपणे गोळ्या घेऊन अधिकार्‍यांनी केला शुभारंभ

राष्ट्रीय हत्ती रोग दुरिकरण मोहीम  * सामूहिकपणे गोळ्या घेऊन अधिकार्‍यांनी केला शुभारंभ राजुरा, वार्ताहर  –            राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम ( आयडीए ) निमित्य सतत 15 दिवस चालणाऱ्या मोहिमेच्या आज दिनांक 1 जुलै ला पहिल्या दिवशी राजुरा तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकार्‍यांनी स्वतः गोळ्या सेवन करून शुभारंभ केला. जनतेने स्वतः पुढे …

Read More »

एकोणा विस्तारीत प्रकल्पग्रस्तांना त्वरीत मोबदला व नोकरी द्यावी – हंसराज अहीर

एकोणा विस्तारीत प्रकल्पग्रस्तांना त्वरीत मोबदला व नोकरी द्यावी – हंसराज अहीर* *वेकोलि माजरी क्षेत्रीय महाप्रबंधकांशी विविध प्रश्नावर चर्चा* चंद्रपूर:- वेकोलि माजरी क्षेत्रातील एकोणा एक्स्टेंशनकरिता अधिग्रहीत केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना अजुनपर्यंत जमिनीचा मोबदला व नोकरी देण्यात आलेली नाही. जमिनीमध्ये सिंचनाची सुविधा असतांना या जमिनींना सिंचीत चा दर देण्यात आलेला नाही. एकोणा एक्स्टेंशन फार मोठा प्रकल्प असल्याने या प्रकल्पास गती देण्याची जबाबदारी वेकोलि …

Read More »

सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ आणि वनविद्या महाविद्यालयासाठी शासन सकारात्मक पालकमंत्री – विजय वडेट्टीवार

सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ आणि वनविद्या महाविद्यालयासाठी शासन सकारात्मक पालकमंत्री – विजय वडेट्टीवार Ø कृषी दिनी शेतक-यांशी साधला संवाद Ø वसंतराव नाईकांमुळेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी चंद्रपूर,दि. 1 जुलै : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षात या विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे नवीन कृषी विद्यापीठ निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. तसेच …

Read More »

सिंदेवाही शहरासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार , विविध विकास कामांचे भुमिपूजन

सिंदेवाही शहरासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø विविध विकास कामांचे भुमिपूजन चंद्रपूर,दि. 1 जुलै : सन 2022 पर्यंत सर्वांच्या घरी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सिंदेवाही शहरासाठी आसोलामेंढातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. नगर पंचायत सिंदेवाहीच्या वतीने आयोजित …

Read More »

जिल्ह्यात 24 तासात 22 कोरोनामुक्त, 13 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

जिल्ह्यात 24 तासात 22 कोरोनामुक्त, 13 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु चंद्रपूर,दि. 1 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 0 , …

Read More »

जुनोन्यात बिबट्याचा थरार, 5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला

जुनोन्यात बिबट्याचा थरार, 5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला – सामान्य रूग्णालयात उपचार सुरू चंद्रपूर, चंद्रपूर तालुक्यातील जंगलव्याप्त जुनोना गावात बिबट्याने धूम ठोकली. गावालगतच्या बेघर वस्तीमध्ये एका 5 वर्षीय चिमुकल्या मुलीवर हल्ला केला. या हल्लयात ती गंभीर जखमी झाली. जखमी मुलींला तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असून, सद्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवार, 30 जून रोजी दुपारी 3 …

Read More »

अखेर,दालमिया सिमेंट कंपनीतील त्या मृत तरूणानाला मिळाला न्याय. (एसडीपीओ सुशीलकुमार नायकांची कामगिरी मोलाची तर कामगारांची एकता उल्लेखनीय.)

अखेर,दालमिया सिमेंट कंपनीतील त्या मृत तरूणानाला मिळाला न्याय. (एसडीपीओ सुशीलकुमार नायकांची कामगिरी मोलाची तर कामगारांची एकता उल्लेखनीय.) कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत सध्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी कंत्राटी कामगारांचा भरणा करण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर सदर कंपनीत एका ठिकाणी उंचीवर काम करीत असताना “संतोष चव्हाण” नामक २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना २९ जून …

Read More »