Breaking News

Vishwbharat

माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेला आठवा क्रमांक ,ठाणे प्रथम, नवी मुंबई द्वितीय, बृन्हमुंबई तृतीय

माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेला आठवा क्रमांक ठाणे प्रथम, नवी मुंबई द्वितीय, बृन्हमुंबई तृतीय  चंद्रपूर, ता. ५ : शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन 2020-21 मध्ये अभियान राबविण्यात आले. यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेने यशस्वीरित्या उपक्रम पूर्ण केले. यात अमृत गटातून चंद्रपूर मनपाला …

Read More »

राजकीय आरक्षणातून केवळ दलालांचे पिक

राजकीय आरक्षणातून केवळ दलालांचे पिक सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण खारीज केले आहे. हे एका अर्थाने बरे झाले. याविरोधात काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आवाज उठवला असला तरी हे राजकीय आरक्षण कशाला हवे? राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून ब्राम्हणांची दलाली करण्यातच स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणणारे लोक पुढे आहेत. त्यामुळे राजकीय आरक्षण कायमचे बंद करायला हवे असे आमचे ठाम मत आहे. संविधान कलम क्र.३३० …

Read More »

यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात सपन्न

यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात सपन्न चंद्रपुर – ५ जून रोजी सम्पुर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.पर्यावरणाचे जतन व्हावे अशी आशा ठेवून अनेक ठिकाणी हा दिन उत्साहात सपन्न होतो.अश्याच प्रकारे ‘एक झाड पर्यावरणासाठी आपल्या भविष्यासाठी’ असा विचार घेऊन नगाजी बहुद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत यंग थिंकर्स चंद्रपुर च्या समूहा तर्फे स्थानिक छत्रपती नगर चंद्रपुर येथील सार्वजनिक …

Read More »

किसानपुत्र पाळणार शेतकरी पारतंत्र्य दिवस

किसानपुत्र पाळणार शेतकरी पारतंत्र्य दिवस चंद्रपूर :- किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने १८ जून रोजी शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळण्यात येणार आहे. १८ जून १९५१ रोजी झालेल्या पहिल्या घटनादुरुस्तीमुळे भारतीय शेतकरी गुलाम झाला असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे. या आंदोलनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रम करता येत नसला तरी प्रत्येक किसानपुत्राने १८ जून रोजी काळी फीत …

Read More »

आगीत भस्मसात झाले सारे रंग…!

आगीत भस्मसात झाले सारे रंग…! वरोडा, स्व-रक्ताने अपार कष्ट करून रंगवलेल्या चित्रांची राखरांगोळी डोळ्यादेखत होताना बघून एका मनस्वी कलावंताचे हृदय हेलावले. रंग चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या आर्ट गॅलरीला शनिवार, 5 जूनला पहाटे आगीच्या ज्वाळांनी कवेत घेतले आणि सारे रंग एका क्षणात बेचिराख झाले. महारांगोळीकार ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले, आनंदवनातील मूकबधिर विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रल्हाद ठक …

Read More »

वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन प्रियसीवर बलात्कार

बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल बल्लारपूर :- प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर मध्ये घडली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या …

Read More »

दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात – वेळेत होणार अकरावीचे प्रवेश

दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात   – वेळेत होणार अकरावीचे प्रवेश मुंबई, कोरोना महामारीमुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरी निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचे शिक्षण विभागाने ठरवले आहे. या दिशेने शिक्षण विभागाने कामाला सुरुवात केल्याची माहिती आहे. यंदा दहावीला 16 लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता पुढच्या वर्गात जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी दहावीची …

Read More »

हंगामासाठी बळीराजा सज्ज – 4 लाख 82 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन

हंगामासाठी बळीराजा सज्ज – 4 लाख 82 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन चंद्रपूर, खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून शेतकरी सज्ज झाला आहे. बि-बियाणे, खतांची जुळवाजुळव अंतिम टप्यात आहे. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस येईल, असा अंदाज वर्तवला असून, मृग नक्षत्राला गुरूवारपासून प्रारंभ झाला आहे. सध्या ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पाऊस हजेरी लावून गेला. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या …

Read More »

विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी!   – जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प

विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी!   – जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प नागपूर, चीननिर्मित कोरोना विषाणुने जगात धुमाकूळ घातला. यामुळे मानवाने आपण निसर्गापुढे किती फिके पडतो, याचाही अनुभव घेतला. मागील टाळेबंदीने जागतिक पातळीवरील पर्यावरणाचा समतोल वाढला होता. शिवाय प्रदूषणही घटले होते. सर्वांना शुद्ध हवा मिळू लागली होती. पंजाबातील लोकांना तर थेट हिमालयाचे दर्शन घडले होते. हा सर्व चमत्कार प्रदूषणाची पातळी …

Read More »

निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ

निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ (जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष) जेव्हा आमच्या दूरदर्शी महापुरुषांनी ‘वसुधैव कुटुम्बकम’ या दोन अनमोल शब्दांचा उद्घोष केला तेव्हा त्यांनी निश्चितपणे मानवजात व प्रकृती यांच्या संयुक्त अस्तित्वाबाबत सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारण्याचा सल्ला दिला, जो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. “विधात्याने निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीची काळजी घेणे आमचे परम कर्तव्य आहे”.  ही अनमोल वचने संत निरंकारी मिशनची आध्यात्मिक प्रमुख सद्गुरु …

Read More »