एनआयएकडे तपास द्या सभागृहात भाजपची जोरदार मागणी सचिन वाझे संशयाच्या भोव-यात दोन्ही गाड्या ठाण्यातील एटीएसकडे सोपवला तपास मुंबई (प्रतिनिधी) : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलियाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पियो गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणावर आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी …
Read More »प्रादुर्भाव करोनाचा, देशातील १५ लाख शाळा बंद
‘युनिसेफ’च्या अहवालातून करोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम अधोरेखित करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे २०२०मध्ये देशभरातील १५ लाख शाळा बंद राहिल्याने प्राथमिक आणि माध्यमिकच्या २४ कोटी ७० लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. देशातील चार विद्यार्थ्यांंपैकी केवळ एका विद्यार्थ्यांला ऑनलाइन शिक्षणासाठीची आवश्यक साधने उपलब्ध होत असल्याचे पाहणीतून दिसून आले आहे. करोनाच्या प्रादुर्भावाचा शिक्षणावर झालेला परिणाम या अहवालातून अधोरेखित होत आहे. युनिसेफने केलेल्या पाहणीच्या अहवालाचे निष्कर्ष …
Read More »रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! याच महिन्यात सुरू होतेय बहुप्रतिक्षित सेवा,
Indian Railway News: दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) ही सेवा (content on demand in trains) याच महिन्यापासून सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वेचे पीएसयू रेलटेलच्या (RailTel) एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली. बफर फ्री स्ट्रीमिंग मिळणार :- कंटेंट …
Read More »भारत-जपान एकत्र, चीनची दादागिरी मोडणार
चीनची दादागिरी मोडण्यासाठी भारत-जपान एकत्र, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे विस्तारवादी धोरण लक्षात घेऊन भारत आणि जपानने एकत्र येऊन एक महत्त्वाचा लष्करी सहकार्य करार केला आहे. संरक्षण सचिव अजय कुमार आणि जपाचने राजदूत सुझूकी सातोशी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. या करारामुळे संरक्षण सहकार्य दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांच्या सैन्य दलांना परस्परांचे सैन्य तळ …
Read More »चीनला युद्ध हवे असेल तर, त्यांना सुद्धा त्याची जबर किंमत चुकवावी लागेल, भारताने बजावलं
चीनला निर्णायक इशारा, भारताने बजावलं लक्ष्मण रेषा ओलांडू नका अन्यथा… नियंत्रण रेषेजवळील चीनच्या दादागिरीवर भारतीय सैन्याने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने लक्ष्मण रेषा ओलांडली तर, चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा भारताने दिला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. उंचावरील या युद्धक्षेत्रामध्ये भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनकडून आक्रमक पद्धतीने सैन्य तैनाती केली जाते. त्याला प्रत्युत्तर …
Read More »कोणतीही लस ५० टक्केही प्रभावी नाही; WHO ने सांगितले ‘हे’ कारण!
करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी ही तिसऱ्या टप्पात पोहचली आहे. तर, रशियाने जगातील पहिली करोना प्रतिबंधक लस ‘स्पुटनिक व्ही’ विकसित केल्याचा दावा केला आहे. या दरम्यानच जागतिक आरोग्य संघटनेने लशींबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सध्या चाचणी सुरू …
Read More »चीन आणि भारत यांच्या संरक्षण प्रमुखांची ‘बिग संभाव्यता’: ग्लोबल टाईम्सचे संपादक
हू झिजिन यांनी ट्विटरवर आपल्या अधिकृत खात्यावर सांगितले की, चीनचे वेई फेंगे आणि भारताचे राजनाथ सिंह यांच्यात अशा बैठकीची व्यवस्था सूत्रांनी न सांगता केली आहे. बीजिंग (४ सप्टेंबर, २०२० ) :चीन व भारत संरक्षण मंत्री मॉस्कोमध्ये नव्याने सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर भेटण्याची मोठी शक्यता आहे , असे चिनी प्रभावशाली चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने शुक्रवारी सांगितले. हू झिजिन यांनी ट्विटरवर आपल्या अधिकृत खात्यावर म्हटले …
Read More »विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे!
सदस्यांना कोरोना चाचणी बंधनकारक मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानंतर ७ सप्टेंबरपासून अधिवेशन घेण्यात यावा, असा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधा-यांनी अधिवेशन २ दिवसांचे असावे, असा प्रस्ताव मांडला. यावर अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन किमान ४ दिवसांचे असावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अखेर २ दिवसांच्या अधिवेशनाला सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने मंजुरी दिली, अशी माहिती …
Read More »करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर
पुणेः ‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात …
Read More »खुशखबर! राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना वाढीव बिलात मिळणार सूट; राज्य सरकारचा प्रस्ताव तयार
मुंबई ( रिपोर्टर) : लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वीज बिलाचा शॉक बसला. वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्या राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार १ हजार कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. ऊर्जा विभागाने अर्थ विभागाशी चर्चा …
Read More »