Breaking News

क्राईम

२६ लाखांचा अपहार : सरपंचासह ग्रामसेवकाला अटक

धुळे जिल्ह्यातील जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेले सरपंच व ग्रामसेवकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०१६ ते १७ जुलै २०१९ पर्यंत तत्कालीन सरपंच जगन्नाथ रामसिंग मालचे (रा. जेबापूर) व तत्कालीन ग्रामसेवक अनिल ऊर्फ …

Read More »

30 हजारांची लाच घेताना महावितरणचा अभियंता जाळ्यात

सोलर पॅनलचे मीटर बसविण्यासाठी तपासणी अहवाल पाठविण्याच्या कामासाठी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याने 30 हजारांची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास रंगेहाथ अटक केली. चिंचवड येथील महावितरण चाचणी विभाग कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. बाबूराव विठोबा हंकारे (51) असे अटक केलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे. आरोपी बाबूराव हंकारे महावितरणच्या चिंचवड …

Read More »

राज ठाकरेंना अनभिज्ञ् ठेवण्याचा ‘प्लॅन’ : दुरुगकरच्या कारनाम्यामुळे मनसेला निवडणुकीत फटका!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज शुक्रवारी नागपुरात येत आहेत. अनेकांकडून खंडणी घेतल्याच्या आरोपाने मनसेचा नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे कोणती कारवाई करणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेची जनमाणसातील प्रतिमा मलीन होत आहे. येत्या काळात महानगरपालिका निवडणूक असल्याने दुरुगकरच्या खंडणीमुळे मनसेला चांगलाच फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्त्व …

Read More »

खंडणीखोर दुरुगकरची हकालपट्टी कधी? : राज ठाकरे उद्या नागपुरात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्या शुक्रवारी (ता.२३) नागपूर येत असून ते खंडणीखोर नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्व सैनिकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्यासमक्ष खंडणीचा विषय कोणी काढू नये याची खबरदारी विदर्भातील एक बडा आणि दुरुगकरचा पाठिराखा असलेल्या एक पदाधिकारी घेत आहे. त्याकरिता नागपूर विमातळापासूनच ठाकरे यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांची फौज ठेवली …

Read More »

राज ठाकरेंना धक्का,नागपूर जिल्हाध्यक्ष खंडणीत अडकल्याने मनसेची डोकेदुखी

नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर खंडणी प्रकरणात अडकल्याने राज ठाकरे यांना धक्का बसलाय. या प्रकरणामुळे मनसेची चांगलीच डोकेदुखी वाढू शकते. अशा खंडणीखोर पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी होऊ शकते. काही आठवड्यापूर्वी राज ठाकरेंनी विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्राऊंड लेव्हलवरची परिस्थिती जाणून घेतली होती.कार्यकारिणी बरखास्त केली आणि घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याची घोषणा केली. …

Read More »

खंडणी मागणारा नागपूर मनसेचा जिल्हाध्यक्ष अटकेत

एका दुकानदाराला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकरला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना उमरेड तालुक्यातील कुही येथे घडली. दुरुगकर हा चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन कुही गावात गेला. आम्ही अन्न व प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी आहोत, असे सांगून एका दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानात सुगंधी तंबाखू आढळल्याचे सांगून दोन लाखांची खंडणी मागितली. दुकानदाराला खरंच अधिकारी असल्याचे समजले. …

Read More »

मंत्रालयातील कर्मचाऱ्याने केली बोगस नोकर भरती

मुंबई मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याकडून लिपिकपदी नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येकी ०६ ते १० लाख रुपये घेऊन फसवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोगस नोकर भरती रॅकेटच्या आमिषाला बळी पडलेले १० पीडित समोर आले आहेत. प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात महेंद्र सकपाळ, महादेव शिरवाळे, सचिन डोळस व नितीन कुंडलिक या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालाडमधील रहिवासी सागर जाधव …

Read More »

नागपूर : गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कन्हान खाण परिसरातील गोळीबारात गंभीर जखमी जवानाचा अखेर कामठी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वेकोलीच्या खाण क्रमांक सहा परिसरात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेला मिलिंद समाधान खोब्रागडे (वय २९, मूळ रा. अकोला) याच्यावर कामठीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी समीर सिद्दीकी (वय २९ रा. कॉलरी टेकडी) व राहुल …

Read More »

उपकोषागार अधिकारी १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात नाशिकच्या चांदवड उपकोषागार अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीत तडजोडीत १० हजारांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ …

Read More »

नागपुरात १० वर्षांनंतर भरती घोटाळा उघड : ९ अधिकाऱ्यांचा भांडाफोड

नागपुरात तब्बल ९ वर्षांनंतर आयकर विभागातील एक भरती घोटाळा उघडकीस आलाय. हा घोटाळा उघड होताच सीबीआयने ९ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे सर्व अधिकारी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या २०१२-१४ दरम्यान झालेल्या परीक्षांमधून भरती झाले होते. या घटनेमुळे अधिकारी वर्गांत आणि परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये स्टेनोग्राफर रिंकी यादव, सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय …

Read More »