Breaking News

पर्यावरण

*खड्डेयुक्त महामार्ग….!*

*ध्येयवेड्या तरुणांनी बुजवले महामार्गावरील”अपघातग्रस्त खड्डे”* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:– राजूरा-गोविंदपूर महामार्गावरील गडचांदूर शहरा लगत काही ठिकाणी पडलेले अक्षरशः जीवघेणे खड्डे येथील काही ध्येयवेड्या युवकांनी एकत्र येऊन बुजवले.वास्तविक पाहता सध्या सदर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नेहमी लहानमोठे अपघात घडत आहे.युवकांनी बुजवलेले खड्डे काही दिवसापासून नागरिकांना जीवघेणे ठरत होते.ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागायची,कित्येक जण खड्ड्यात पडायचे,काहींनी तर जीव सुद्धा गमावला आहे. दिवसरात्र …

Read More »

72 लाखाचा प्रतिबंधित पानमसाला नष्ट

*अन्न व औषध प्रशासनाची कारवाई* चंद्रपूर, दि. 9 नोव्हेंबर: अन्न व औषध प्रशासन या कार्यालयाने विविध कारवाईत ताब्यात घेतलेला 72 लाख 40 हजार 481 किंमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु, स्विट सुपारी, पानमसाला, खर्रा इ. पानमसाला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आज नष्ट केला. या पानमसाल्याचे वजन 48 हजार 659.27 किग्रॅ. होते. सदर साठा कार्यालयीन वाहनांच्या सहाय्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे डम्पींग यार्ड, बायपास …

Read More »

गोंडकालीन जुनोना तलाव परिसरात श्वास गूदमरतोय

निसर्गाच्या सुगंधाऐवजी घाणीचा दुर्गंध इको-प्रो तर्फे पक्षी अधिवास जुनोना तलाव परिसर स्वच्छता करीत संवर्धनाची मागणी चंद्रपूर: गोंङकालीन राजवटीत मनसोक्त भंम्रती आणि जलविहार करण्यासाठी ज्या स्थळी राजा-राणी यायचे त्या जुनोना तलवाच्या निसर्गरम्य ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट कानी यायचा. म्हणूनच आज पर्यटन मोठ्या हौसेने या ठिकाणी आनंद लुटायला येतात. पण, भान हरपून आणि पर्यावरणाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून घाण करू लागले आहेत. त्यामुळे या …

Read More »

चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यात  पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. त्यानंतर सर्व्हे करून पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना ९५ हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी ५० हजार …

Read More »

विसर्जनासाठी २० कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश सज्ज

चंद्रपूर : शनिवारी गणेशचतुर्थीला श्रीगणेशाचे आगमन झाले असून यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर असल्याने उत्सव साजरा करताना दिशानिर्देशांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पूर्ण तयारी करण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी २० कृत्रिम तलाव तसेच २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच १० दिवसांच्या गणपतींचे विसर्जन …

Read More »