Breaking News

विदर्भ

घुग्घुस बि.आर.एस.पी चा बेमुदत धरणे आंदोलन

घुग्घुस ( प्रभाकर कुम्मरी)- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून दी.1 एप्रिल 2021 रोजी घुग्घुस आठवडी बाजार रंगमंच येथे 30 बेड रूग्णालयाचे बांधकाम लवकर सुरू करण्या करीता बि.आर.एस.पी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ अँड. सुरेश माने सर यांचा मार्गदर्शनाखाली व  सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते . बि.आर.एस.पी च्या या आंदोलनाची …

Read More »

सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सीटी स्कॅनसारख्या तपासण्या करण्याची आवश्यकता भासत आहे. या तपासणीसाठी खाजगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेली तपासणी केंद्राकडून एचआरसीटी-चेस्ट चाचणीकरिता शासनाने निश्चित करून दिलेल्या सर्व करासहीतच्या खालील दराप्रमाणे किंवा यापुर्वी त्यापेक्षा कमी दर असल्यास त्याप्रमाणे दर आकारणी …

Read More »

अधिकार्‍यास लाच घेताना अटक

अधिकार्‍यास लाच घेताना अटक चंद्रपूर- जमिनीचे फेरफार करुन देण्याच्या कामासाठी 1 हजार 500 रुपयाची लाच स्वीकारणार्‍या भद्रावती तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकार्‍यास रंगेहाथ अटक करण्यात आली. प्रशांत नरेंद्रप्रतापसिंह बैस असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरूवार, 1 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. चंद्रपूर येथील रहिवासी तक्रारदार यांची चंदनखेडा साजा अंतर्गत चरूर घारापुरी येथे शेती आहे. या शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वजारोहण सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वजारोहण सोहळा  चंद्रपूर १ एप्रील – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा ध्वजारोहण तथा लोकार्पण कार्यक्रम तिथीप्रमाणे ३१ मार्च रोजी मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार बल्लारपूर तथा लोकलेखा समिती अध्यक्ष यांच्या  हस्ते करण्यात आले. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिल्पाच्या बाजुला …

Read More »

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक ,चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस चंद्रपूर- विदर्भातच नव्हे, तर अख्ख्या जगात अनेकदा चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक राहिले आहे. यंदा मात्र मे महिना उजाडण्याच्या आधीच आणि कोरोनाच्या सावटात एप्रिल हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागत आहे. गत तीन दिवसांपासून उन्हाचा पारा बराच चढला आहे. गुरूवारी भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 43.8, तर ब्रम्हपुरी …

Read More »

कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात आजपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरणाचे उद्दिष्टदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व गावातील प्रत्येक वार्डाला मतदान यादीप्रमाणे जसे मतदान केंद्र ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणे लसीकरण केंद्र जोडण्यात यावे अशा सूचना …

Read More »

गत 24 तासात 120 कोरोनामुक्त,353 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू

गत 24 तासात 120 कोरोनामुक्त,353 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू  आतापर्यंत 25,390 जणांची कोरोनावर मात  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2291 चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 353 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 110 …

Read More »

पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व नसावे.

  पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व नसावे. चार पायाच्या जनावरांत आणि जलतळ प्राण्यात संस्था,संघटना,पक्ष नसतात तरी ते संकटात सापडल्यावर एकत्र येऊन संघटीत पणे मुकाबला करतात त्यात कोणी नेता नसतो.पण सामूहिक नेतृत्व मात्र कायम असते.त्यांचे वर्णन लोकशाहीर वामन दादा कर्डक यांनी एका गीतात खूप अर्थपूर्ण केली आहे. “अन्याय अत्याचारांची येतच हाक रे भरुरूरू उडावी पाखरे” चिमणी पाखरे,मध माश्या आणि मुंग्या यांचे संघटन वैचारिक …

Read More »

गडचांदूरातील युवकांची कचरामुक्त होळी कौतुकास्पद.,अभिनव संस्थेचा “अभिनव” उपक्रम.

गडचांदूरातील युवकांची कचरामुक्त होळी कौतुकास्पद. (अभिनव संस्थेचा “अभिनव” उपक्रम.) कोरपना(ता.प्र.):-          होळीचा सण सर्वत्र मोठ्या हर्षोल्हासाने साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील “अभिनव सामाजिक विकास संस्था” तर्फे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.सदर संस्थेच्या तरुणांनी वास्तव्यास असलेल्या वार्डात सैरावैरा पडलेला संपूर्ण प्लास्टिक व इतर केरकचरा एकत्रित करून जाळले.या अभिनव उपक्रमात नागरिकांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शहर स्वच्छ …

Read More »

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून तहसिल, कृषी व पंचायत समिती या शासकीय कार्यालयाच्या अवरामध्ये मा. मुख्यमंत्री यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू करण्यात आले.या बाजाराचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कु अश्विनी कुंभार …

Read More »