अभिनेते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. १९३५ मध्ये ‘इन्कलाब’या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली. वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये दीवार व पठाण या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘नीलकमल’मध्ये त्यांना मधुबालाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळात त्यांनी भालजी पेंढारकरांच्या ‘वाल्मिकी’मध्ये नारदाची भूमिका केली. थिएटर ते मोठ्या पडद्यावर येण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. …
Read More »