Breaking News

बॉलीवूडवर ‘राज’ करणारा

Advertisements

अभिनेते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. १९३५ मध्ये ‘इन्कलाब’या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली. वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये दीवार व पठाण या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘नीलकमल’मध्ये त्यांना मधुबालाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळात त्यांनी भालजी पेंढारकरांच्या ‘वाल्मिकी’मध्ये नारदाची भूमिका केली. थिएटर ते मोठ्या पडद्यावर येण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले.                                                                                                                          एक निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिन्ही भूमिका वठवली ती ‘आग’ चित्रपटात. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी हा चित्रपट काढला. हा चित्रपट चाललाही. १९४९ मधील ‘बरसात’ तुफान गाजला. नर्गिसबरोबर राज यांची जोडी अधिक जमली. दोघांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. तिची अदा ‘आर. के. फिल्म’चा लोगोच बनून गेली. नर्गिसने आणि राज यांच्यासोबत केलेला शेवटचा चित्रपट म्हणजे ‘जागते रहो.’ त्यानंतर नरगीसने त्यांच्यासोबत चित्रपट केला नाही. त्याचवेळी राज यांना ‘शो मॅन’ हे नामाभिधान मिळाले. ‘आवारा’,‘श्री ४२०’ हे चित्रपट परदेशातही गाजले. असे म्हटले जाते की, त्यावेळी मेहबूब, कारदार व सोहराब मोदींप्रमाणे आपलाही स्टुडिओ असावा, असे राज यांना वाटायचे. ‘बरसात’ यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील चेंबूरला स्टुडिओ विकत घेतला.
पुढील काळात राज कपूर यांनी अनाडी,फिर सुबह होगी, शारदा, परवरीश, छलिया,चार दिल चार राहे, दो उस्ताद आदी चित्रपट निर्माण केले. संगम, बूट पॉलिश, जिस देश मे गंगा बहती है, सत्यम शिवम सुंदरम यासारखे चित्रपट गाजले. मेरा नाम जोकर चित्रपटात त्यांनी बरेच पैसे गुंतवले होते; परंतु, हा चित्रपट सटकून आपटला आणि राज आर्थिक तोट्यात आले. त्यांनी हार न मानता ‘बॉबी’निर्माण केला. ‘बॉबी’मध्ये प्रेमाचा तरल विषय हाताळला. ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटासाठी शंकर-जयकिशनऐवजी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेऊन हा चित्रपट काढला. ऋषी कपूरसाठी मुकेश यांच्याऐवजी शैलेंद्र सिंग यांना घेऊन गाणी आणली. ‘बॉबी’ हिट झाला.‘कल आज और कल’या चित्रपटातून जनरेशन गॅपसारखा विषयही मांडला. ‘राम तेरी गंगा मैली’ या वेगळ्या विषयावरील चित्रपटानेही मोठे यश मिळवले.
राज कपूर यांचा विवाह
राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचा विवाह १९४६ मध्ये मध्य प्रदेशातील रिवामध्ये झाला होता. दोघांची कथा देखील रोमांचपूर्ण आहे. दोघांच्या पहिल्या भेटीनंतर एक वर्षांनी दोघांचा विवाह झाला. विवाहाआधी कृष्णा कपूर यांचे नाव कृष्णा मल्होत्रा असे होते. पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत त्यांची दोन मुले राज कपूर आणि शम्मी कपूर होते. राज कपूर २२ वर्षांचे होते; त्यावेळी पृथ्वीराज कपूर आणि कृष्णा यांचे वडिल कर्तारनाथ मल्होत्रा यांची मैत्री झाली. ही मैत्री नंतर नात्यात बदलली. पृथ्वीराज कपूर यांनी आपला मुलगा राज कपूर यांचा विवाह कृष्णा यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला. ते वरात घेऊन मुंबईहून रिवा येथे पोहोचले. सरकारी बंगल्यात विवाहसोहळा पार पडला. रिवाशी इतकी जवळीक होती, कृष्णा यांनी आपल्या मुलीचे नाव रिमा ठेवले. राज कपूर आणि कृष्णा कपूर यांना रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, रिमा कपूर आणि रितू नंदा अशी पाच मुले आहेत.
फाळके पुरस्कार
शांतारामबापू आणि राज कपूर हे दोघेही दिग्दर्शक. दोघांनाही दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरामन पारितोषिक देण्यासाठी मंचावरून उतरून राज कपूर यांच्याजवळ आले होते. राज यांच्या पत्नी कृष्णा यांनी पुरस्कार स्वीकारला होता. असा हा ‘शो मन’ २ जून १९८८ रोजी पडद्याआड गेला.

Advertisements

***

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?◾️   ◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, …

ममता बॅनर्जीला कुणीतरी धक्का दिलाय : डॉक्टरांचा खळबळजनक दावा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता कालीघाट येथे राहतात. “ममता बॅनर्जी घरात पडल्या तो अपघात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *