विश्व भारत ऑनलाईन :
केंद्रात औरंगाबादचे दोन केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे तीन कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असे सहा जण सरकारमध्ये आहेत. पण एवढी मंत्रिपदे मिळूनही जिल्ह्याचा विकास झाला नाही. तर या मंत्रिपदाचा काय उपयोग होईल, असा सूर पालकमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शनिवारी (१५ ऑक्टोबर) व्यक्त केला.
आम्ही सर्वजण मिळून औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. जिल्हा बँकेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, भुमरेंचा सत्कार झाला. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निमंत्रण नसल्याबद्दल भुमरे यांनी खंत व्यक्त केली. विरोधी पक्षनेते आमचेच आहेत, असेही ते म्हणाले.
रस्ते, पाणी आणि अनेक समस्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. केवळ राजकारण न करता विकास साधावा, अशी मागणी नागरिक करतात.