Breaking News

२४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Advertisements

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.

Advertisements

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Advertisements

आज म्हणजेच गुरूवारी सायंकाळी या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. शिंदे फडणवीस सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचाही समावेश आहे.

कोणकोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
धनंजय आर कुलकर्णी : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत – पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

पवन बनसोड : अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रा- पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

बसवराज तेली : पोलीस उप आयुक्त नागपूर शहर- पोलीस अधीक्षक,सांगली

शेख समीर अस्लम : अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली- पोलीस अधीक्षक, सातारा

अंकित गोयल : पोलीस अधीक्षक, गडचिरोली- पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

शिरीष एल सरदेशपांडे : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक- पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण

राकेश ओला : पोलीस अधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूर- पोलीस अधीक्षक, अहमदनगर

एम. राजकुमार : पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर- पोलीस अधीक्षक, जळगाव

रागसुधा आर. : समादेशक , राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३ जालना- पोलीस अधीक्षक, परभणी

संदीप सिंह गिल : समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ हिंगोली – पोलीस अधीक्षक, हिंगोली

श्रीकृ्ष्ण कोकाटे : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, नांदेड

सोमय विनायक मुंडे : अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली – पोलीस अधीक्षक- लातूर

सारंग डी आवाड : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, बुलढाणा

गौरव सिंह : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक- पोलीस अधीक्षक, यवतमाळ

संदीप घुगे : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ११ नवी मुंबई – पोलीस अधीक्षक, अकोला

रवींद्रसिंग एस. परदेशी : उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

नुरुल हसन : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, वर्धा

निखील पिंगळे : पोलीस अधीक्षक, लातूर- पोलीस अधीक्षक, गोंदिया

निलोत्पल : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, गडचिरोली

संजय ए बारकुंड : पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर- पोलीस अधीक्षक, धुळे

श्रीकांत परोपकारी : प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर

सचिन अशोक पाटील : पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण- पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद

लक्ष्मीकांत पाटील : पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर

पराग शाम मणेरे : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत- उप आयुक्त विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) मुंबई

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर कुणावर करणार कारवाई : नागपुरात मतदान कमी होण्यासाठी जबाबदार कोण?

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबद्दल सार्वत्रिक ओरड होत …

हे काय सुरु आहे?नागपुरातील मतदानात तफावत

नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *