Breaking News

नागपूर : कन्हान नदीत 2 युवकांचा बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात असलेल्या वाकी येथील कन्हान नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.

कुणाल गणेश लोहेकर (वय 24) आणि नितेश राजकुमार साहू (वय 27) ही मृत झालेल्या युवकांची नावे आहे. स्नेहदीप कॉलनी, जरीपटका नागपूर येथून दहा ते बारा मुले मोटारसायकलने पोहायला वाकी येथे गेले होते. तसेच नदीत पोहताना या दोघांचा मृत्यू झाला. त्यातील कृणाल प्रिन्स लोहकरे हा आंघोळीसाठी आला होता. नदीत कुणालला बुडताना पाहून नितेश गणेश शाहू हा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र पाणी खोल असल्याने या दोघांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत कन्हान नदीच्या पाण्यात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच नदीच्या काठावर अपघातस्थळी प्रशासनाकडून सूचना फलक लावण्यात आला असून, नदीत पोहण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. माहिती फलकाकडे दुर्लक्ष करून लोक नदीपात्र उतरतात आणि जीव गमावून बसतात.

About विश्व भारत

Check Also

पुलिस ने पकड़ी 17 लाख की 350 पेटी अवैध शराब : आरोपी गिरफ्तार

पुलिस ने पकड़ी 17 लाख की 350 पेटी अवैध शराब : आरोपी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: …

करोड़ों कें हवाला कांड में हाई वोल्टेज ड्रामा: SP का निलंबन आदेश

करोड़ों कें हवाला कांड में हाई वोल्टेज ड्रामा:SP का निलंबन आदेश   टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *