Breaking News

चालू बील भरलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या कापू नका-फडणवीसांचे निर्देश

Advertisements

काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्यादृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने एक निर्णय घेतलाय. ज्या शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

Advertisements

त्यामुळे बळीराजाला तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महावितरणकडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे कनेक्शन कापले जात आहे. या कारवाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisements

वीज बिल न भरल्याने वसुली सुरु असते. परंतु, अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचं नुकसान झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सूट द्यावी, असे फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून सध्याचे बील घ्या, इतर वसूली नंतर घ्या. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन लगेच कापू नका, असा सूचनाही फडणवीसांकडून देण्यात आल्या आहेत.

काही दिवसांमध्ये महावितरणने वीजबिलाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला होता. काही जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून शेतकऱ्यांनी बिलाचे पैसे भरावेत, यासाठी ट्रान्सफॉर्मर्स बंद केले होते. तसेच लहान डीपी काढण्याचा सपाटा लावला होता. शेतकऱ्यांनी किमान दोन महिन्यांची वीजबिलाची थकबाकी भरावी, असा महावितरणचा आग्रह होता. मात्र, तरीही बील न भरलेल्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यामुळे आता कुठे अतिवृष्टीच्या संकटातून उभारी घेऊ पाहत असलेले शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु, आता देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर या शेतकऱ्यांना तात्पुरता का होईना, दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता आता रब्बीच्या पेरण्या किंवा नव्या पिकांसाठी प्रयत्न सुरु असतील. ही गोष्ट लक्षात घेऊन मी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की, जे बील भरु शकतात त्यांनी बील भरलं पाहिजे. पण जे अडचणीत आहेत त्यांनी सध्याचं बील जरी भरलं तरी त्यांना सूट देण्यात यावी. त्यांचं वीज कनेक्शन तोडू नये, भविष्यात त्यांच्याकडून आपल्याला वसूली करता येईल. अतिवृष्टी झालेल्या भागात सक्तीची वसुली करु नये, केवळ एक बील घेऊन विषय बंद करायला मी सांगितलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात नायब तहसीलदाराची आत्महत्या : कौटुंबिक कारण की आणखी काही?

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वानाडोंगरी येथील ग्रीन फील्ड सोसायटीमध्ये मौदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *