देशातील संसदेच्या नवीन इमारतीसाठी अर्थात सेंट्रल विस्टासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाचा वापर केला जात आहे.
चंद्रपूर हा वनांनी नटलेला जिल्हा आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल आणि वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या जंगलातील सागवान लाकूड नवीन संसद भवन म्हणजे नवी दिल्ली इथे तयार होत असलेल्या ‘सेंट्रल विस्टा’मध्ये वापरण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेपी नड्डा यांच्या जाहीरसभेत दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील लाकडामध्ये आढळणारा रिंग आणि ग्रेन पॅटर्न हा देशात सर्वाधिक सुंदर असल्यामुळे या लाकडाची निवड करण्यात आली आहे. किमान 200 वर्ष तो खराब होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेअंतर्गत भारतीय लाकूडच वापरण्याचे निर्देश दिले आणि चंद्रपूरच्या सागवानाची निवड करण्यात आली. संसद भवनाच्या इंटिरिअरसाठी बल्लारपूर वनविभागाच्या लाकूड डेपोमधून सागवान खरेदी केल्याचे कळते.