Breaking News

भटक्या कुत्र्यांच्या मुद्दावर बच्चू कडूंचा वादग्रस्त उपाय

Advertisements

महाराष्ट्र विधानसभेत भटके कुत्रे आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान प्रहार जनशक्तीचे पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांना आसामला पाठवा, कारण आसामची लोक कुत्रे खातात, असे वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केले.आसाममध्ये कुत्र्यांना 8 हजार रुपयांचा दर मिळू शकतो, यामुळे राज्यातली भटक्या कुत्र्यांची समस्या दूर होईल आणि कुत्र्यांची लोकसंख्याही नियंत्रणात येईल, त्यामुळे कुत्र्यांना आसामला पाठवावं, असं कडू म्हणाले.

Advertisements

सध्या फक्त एका शहरासाठीच हा प्रयोग केला पाहिजे, असं मतही बच्चू कडू यांनी मांडलं. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याचा प्राणी प्रेमी आणि पशू अधिकारांची लढाई लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. बच्चू कडू यांचं विधान अमानवी आणि अपमानकारक असल्याची टीका त्यांनी केली आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता, त्यावर बच्चू कडू बोलत होते.

Advertisements

याआधी झारखंडमध्ये भाजप आमदार बिरंची नारायण यांनीही असंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भटक्या कुत्र्यांचा हल्ला रोखण्यासाठी सरकारने उपाय करावेत, अन्यथा नागालँडच्या लोकांना इकडे बोलवा, समस्या दूर होईल, असं बिरंची नारायण म्हणाले होते.

बोकारोचे भाजप आमदार बिरंची नारायण यांनी झारखंड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. रांचीच्या डॉग बाईट सेंटरमध्ये रोज जवळपास 300 लोक येतात, असा दावा नारायण यांनी केला. पाळीव प्राणी प्रेमी वैध लायसन्सशिवाय कुत्र्यांना पाळत आहेत. बोकारोमध्ये कुत्र्यांना पकडण्यासाठी, त्यांच्यावर उपाय करण्यासाठी आणि त्यांची नसबंदी करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही, असे आमदार नारायण म्हणाले होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो टुक बयान

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो …

नकली शिवसेना का कांग्रेस में विलय होना पक्का? बाल ठाकरे का नाम लेकर भावुक हुए PM मोदी

नकली शिवसेना का कांग्रेस में विलय होना पक्का? बाल ठाकरे का नाम लेकर भावुक हुए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *