Breaking News

भूकंपाने नागरिक हादरले : कोणता तालुका? वाचा

मकर संक्रांती सणादिवशी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. आज (दि.१५) सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात धक्का जाणवला. दिल्ली येथील भूकंप मापन केंद्रात २. ३ रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.

लोहारा तालुका हा भूकंपग्रस्त तालुका असून भुकंप प्रवण क्षेत्रात येतो. १९९३ साली झालेल्या महाप्रलंयकरी भूकंपाच्या कटू आठवणी अजून नागरिक विसरलेले नाहीत. अधूनमधून तालुक्याला भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सास्तुर, माकणीसह परिसरात आजही भीतीचे वातावरण आहे.

लोहारा तालुक्यात आज मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतानाच सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास सास्तुरसह माकणी, होळी, राजेगाव, धानुरी, चिंचोली काटे, खेड, करजगाव, तावशीगड, परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याचे स्थनिक ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी जमिनीतून गूढ आवाज कानावर पडताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. तर धक्क्याने कपाटावरील भांडी दणाणली.

या सौम्य भूकंपाच्या धक्क्याची दिल्ली येथील भूकंप मापन केंद्रात २. ३ रिस्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती कुलाबा मौसम विभागातील वैज्ञानिक (अ) किरण नारखेडे यांनी दिली आहे

About विश्व भारत

Check Also

रेती ढुलाई पर प्रतिबंध से जरुरतमंद निर्माता फर्मों और मजदूरों पर संकट

रेती ढुलाई पर प्रतिबंध से जरुरतमंद निर्माता फर्मों और मजदूरों पर संकट टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक …

बंजारा विरुद्ध ST, दूसरी तरफ मराठा बनाम ओबीसी : CM फडणवीस चिंता में

बंजारा विरुद्ध ST, दूसरी तरफ मराठा बनाम ओबीसी : CM फडणवीस चिंता में टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *