Breaking News
Oplus_131072

आज कोण अर्ज मागे घेणार? बंडखोरी थंड करण्याचे सर्वच पक्षाचे प्रयत्न

उमेदवारीपूर्व मेळावा घेण्याची घोषणा आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी केली अन् भाजप ज्येष्ठ हडबडून गेले. त्यावेळी आर्वी मतदारसंघसाठी अधिकृत उमेदवार भाजपने जाहीर केला नव्हता. पण केचे हे परतीचे दोर कापून बंडखोरी करू शकतात हे हेरून हालचाली झाल्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केचेंना भेटीस बोलावले. भेट झाली आणि केचे म्हणाले की फडणवीस यांनी सगळे काही व्यवस्थित होईल, तू पहिले मेळावा रद्द कर, व तसा जाहीर मेसेज मला वॉट्सअप कर, असे सांगितल्याचे केचे म्हणाले. केचेंनी तसेच केलेही. विशेष म्हणजे केचे या घडामोडी पत्रकारांसोबत शेअर पण लगेच करीत. म्हणजे भाजप कर्त्याधर्त्यांनी गोपनीय केलेली चर्चा सार्वजनिक करीत केचे दबावाचे राजकारण करीत असल्याचे दिसून येत होते. पण केचे शांत होणारच, अशी खात्री भाजप वर्तुळ देत होतेच. त्यामागचे कारण एका वरिष्ठ नेत्याने उलगडले.

 

राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे हे पत्नी मयुरा काळे हिलाच उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेसकडे हट्ट धरून बसले असल्याची बाब एव्हाना सार्वजनिक झाली होती. पत्नीसाठी उमेदवारी त्यांनी खेचून आणताच भाजप वर्तुळणे मग केचेंवर अधिक फोकस केला. केचे यांच्या उमेदवारीपेक्षा सुमित वानखेडे यांचे असणे यामागे असलेले सूत्र अधिक प्रभावी ठरले. विद्यमान आमदार बदलून नवा उमेदवार दिल्यास फायदा होण्याची शक्यता अधिक. त्यातच खासदार काळे यांचे नॉट रिचेबल प्रकरण नाराजीचे कारण ठरत असल्याची चर्चा. परत अन्य निष्ठावंत नेत्यांना डावलून पत्नीसाठी त्यांनी आणलेली उमेदवारी भाजपसाठी विजयाची संधी ठरू शकते म्हणून मग नवा उमेदवार देत केचे यांना येणकेन प्रकार घरी बसविण्याचे डाव प्रभावी करण्यात आले, असे म्हटल्या जाते.

 

लोकसभा निवडणुकीत खासदार पराभूत झाल्याने नवा गडी द्यायचे पक्के झालेच होते. खासदार तडस यांना बदलून सागर मेघे यांना उमेदवारी दिली असती तर वेगळा निकाल दिसला असता, असा सूर काहींनी काढला. केचे म्हणत की जे मला देण्याचे आश्वासन तुम्ही देता तेच त्याला ( वानखेडे ) का देत नाही. पण केचे बदलून आर्वीत नवा गडी देण्याचा डाव खूप पूर्वी आकारास येत होता. मी उमेदवार, असा चकार शब्द वानखेडे यांनी कधी काढला नव्हता. भाजपचा लोकसभेत पराभव झाला आणि वानखेडेच लढणार हे पक्के झाले.

 

आघाडीने उमेदवार बदलला, आपणही बदलू, अशी रणनीती पक्की झाली. त्यातच खासदार पत्नीचा पराभव करण्याचे टार्गेट पूर्ण करण्यास काही भाजप विरोधी पण मदत करतील, हे गृहीत धरण्यात आले. आयुष्यात प्रथमच चार्टर विमानात बसून थेट अमित शहा यांच्या भेटीला जाण्याचा योग केचेंना फळला. अन्यथा मोदी यांच्या सभेत मागच्या रांगेत गेलेल्या केचेंना शहा यांच्या दिवाणखान्यात बसण्याची संधी कधीच मिळाली नसती.

About विश्व भारत

Check Also

रामटेकमध्ये आशिष जैस्वाल यांची दमछाक : राजेंद्र मूळक मारणार बाजी?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार …

उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावरून वातावरण तापले

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सोमवारी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेसाठी आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *