Breaking News

EVM मध्ये घोळ!नागपुरातून आंदोलनाला सुरुवात

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

 

नागपुर।नागपुर जिल्हाचे महादुला नगर येथुन ई व्ही एम मशीन च्या विरोधात आंदोलन करण्यात आले।वर्तमान आधुनिक युगात विदेशात ई.व्हि.एम. चा वापर पुर्णपणे बंद असतांनी आपल्या देशात निवडणूक आयोग ई.व्हि.एम. चा वापर बंद का करीत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. निवडणूकीत ई.व्हि.एम. चा गैरवापर पुर्णपणे बंद करण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक महादुला ते संविधान चौक, नागपूर पर्यंत माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते या रॅली मध्ये मोठ्या संख्येने युवकांचा समावेश होता. माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान चौक, नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रामटेक लोकसभाचे खासदार मा. श्यामकुमार बर्वे, उमरेडचे आमदार संजयजी मेश्राम, कामठी विधानसभेचे नेते मा. सुरेशभाऊ भोयर, माजी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्रजी मुळक, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदाताई राऊत, महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, शिक्षण सभापती राजुजी कुसुंबे, जिल्हा परिषद सदस्या शांताताई कुमरे, कामठी पं.स. च्या सभापती दिशा चनकापुरे, देवेंद्रजी गोडबोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय रामटेके यांनी केले. यावेळी नागपूर जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

प्रकाश भालेराव यांची भाजपच्या ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता सेलच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती

दिं- ४/१०/२५ शणीवार ला,* *माहाळ्गीनगर- बेसा रोड येथे दीपलक्ष्मी* *सभाग्रह येथे भारतीय जनता पक्ष जिल्हा …

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *