Breaking News

एक लाख मतदान केंद्र…!मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्यातील मतदानाची झारखंडमधील मदतानाशी तुलना करून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र राज्यातील लोक संध्याकाळीच मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतात. शेवटच्या दोन तासांत ७६ लाख मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला जात असला तरी एक लाख मतदान केंद्रांचा विचार करता एका मतदान केंद्रावर फक्त ७६ लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केला.

राज्यात शेवटच्या दोन तासांत मतदानात झालेल्या वाढीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल आहे. टपाली मतदानाचा कल आणि मतदान यंत्रातील मतांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा शिवसेनेने (उद्धव ठाकरे) केला आहे, तर मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजताचे मतदान आणि दुसऱ्या दिवशी आयोगाने जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी यात ६.८३ टक्क्यांची वाढ असल्याचा आरोप काँग्रेसने केला. निवडणूक आयोगाने मात्र महाविकास आघाडीकडून करण्यात येणारे आरोप फेटाळले.

About विश्व भारत

Check Also

रेती ढुलाई पर प्रतिबंध से जरुरतमंद निर्माता फर्मों और मजदूरों पर संकट

रेती ढुलाई पर प्रतिबंध से जरुरतमंद निर्माता फर्मों और मजदूरों पर संकट टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक …

बंजारा विरुद्ध ST, दूसरी तरफ मराठा बनाम ओबीसी : CM फडणवीस चिंता में

बंजारा विरुद्ध ST, दूसरी तरफ मराठा बनाम ओबीसी : CM फडणवीस चिंता में टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *