सोयाबीनच्या 329 तक्रारींमध्ये बियाणे सदोष – संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल – शेतकऱ्यांना 4 लक्ष 85 हजार रुपयांची नुकसान भरपाई

  • वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:-  खरीप हंगामात सोयाबिन बियाणे उगवणीबाबत प्राप्त  ५३० तक्रारीपैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष असल्याचे आढळून आल्यामुळे ईगल सिड्स प्रायव्हेट लिमिटेड या इंदोर येथील कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ११७ शेतकऱ्यांना १८९ बॅग सोयाबिन बियाणे वितरण करून  ४ लक्ष ८५ हजार ७५०  रुपये नुकसान भरपाई म्हणुन कंपनीने आतापर्यत अदा केले असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी दिली.

जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस बियाण्यांच्या ५३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने (तालुका कृषी अधिकारी – अध्यक्ष, कृषी अधिकारी, पंचायत समिती – सदस्य सचिव, कृषी विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञ – व इतर सदस्य) प्राप्त झालेल्या संपुर्ण ५३० तक्रारीची तपासाणी करुन पंचनामे केले आहे.  त्यापैकी एकुण ३२९ तक्रारींमध्ये  तालुका स्तरीय समीतीच्या तपासणी मध्ये बियाणे सदोष आढळुन आले.  त्याअनुषंगाने बियाणे सदोष असल्यामुळे ईगल सिड्स प्रा. ली. इंदोर या कंपनीवर हिंगणघाट कृषी अधिकारी यांनी 3 जुलैला गुन्हा दाखल केला  असुन पुढील कार्यवाही सुरु आहे.

 

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत गुणनियंत्रण निरिक्षकामार्फत खरीप हंगामामध्ये आतापर्यंत बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व किटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या वेळेस आढळुन आलेल्या त्रुटीच्या अनुषगाने बियाणे ४७, रासायनिक खते १७, व किटकनाशक ६  अशा एकुण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंद आदेश देण्यात आला. तसेच शासनामार्फत जिल्हा परिषद कृषी विभागाला अप्रमाणित बियाणे २७० ,कीटकनाशके ४९ व रासायनिक खतांचे १९२  नमुने घेण्याचा लक्षांक देण्यात आला होता. त्याअनुषंगाने आतापर्यंत  बियाणे – १६९, रासायनिक खते- १२२, व किटकनाशक १८ नमुने घेवुन विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले. विश्लेषणाचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये  बियाणे -१० नमुने, रासायनिक खते – ७ नमुने अप्रमाणीत घोषीत झाले. याबाबत  ६ कंपनी व ६ कृषी केद्रांवर न्यायालयीन खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

तसेच पंचायत समिती सेलु अंतर्गत केळझर येथे बोगस बिटी बियाणे सापडल्याने पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी संबधीतावर  २० जूनला गुन्हा दाखल  केला आहे. कृषी विभाग व जिल्हा परिषदच्या भरारी पथकाने बोगस खत,बियाणे सापडल्याने संयुक्त कार्यवाही करुन 21 जूनला  संबधीतावर गुन्हा दाखल केला आहे अशी माहीती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी दिली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *