सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता

नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण

चंद्रपूर दि.12 मे :बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर निश्चित करण्यात आले असून राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नियमित गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे.

असे राहतील वितरित करण्यात येणाऱ्या शिधाजिन्नसांचे वस्तूंचे दर व परिमाण:

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो यानुसार मोफत देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गहू  प्रति शिधापत्रिका 15 किलो व तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो यानुसार मोफत देय राहील, तर साखर 20 रुपये प्रति किलो दराने, प्रति शिधापत्रिका 1 किलो शिधापत्रिका धारकांना देय राहील.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू व तांदूळ मोफत असून गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो परिमाणाने देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गहू व तांदूळ मोफत असून गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो परिमाणाने देय राहील. असे बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *