शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी केली कारवाई,नियमभंग केल्याप्रकरणी 46 हजारांचा दंड वसूल

शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी केली कारवाई

नियमभंग केल्याप्रकरणी 46 हजारांचा दंड वसूल

चंद्रपूर, ता. ११ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. ११) मनपाचे उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. नियमभंग केल्याप्रकरणी 46 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, श्री. पंचभुते व व झोन २ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत हसन अली अकबर अली यांचे बाधकाम सुरु असताना 10 वर कामगार एका ठिकाणी आढळून आल्याने 10000/- रु. दंड करण्यात आला. याशिवाय जीबी सन्स यांना रु 25000/, दीपक एजन्सी 5000/- रु, अग्रवाल एजन्सीकडून 5000/- रु व गणपती ट्रेडिंगकडून  1000/- रू असे एकूण 46000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *