Breaking News

गणपती विसर्जन,तिघांचा मृत्यू

Advertisements

वर्धा : गणेश विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली. कार्तिक तुळशीराम बलवीर (९), अथर्व सचिन वंजारी (१४) व संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३५), अशी मृतांची नावे आहेत.

Advertisements

धुमधडाक्यात मिरवणुका निघाल्या. गावोगावी हीच स्थिती आहे. मांडवा गावातून काही जण विसर्जनासाठी निघाले. कालवा खोलीकरणासाठी झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरले. अल्पवयीन मुलांनी विसर्जन केले. त्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना वाचविण्यासाठी तरुण संदीपने पाण्यात उडी घेतली. तिघेही बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या लहान मुलानी गावात धूम ठोकली. गावकरी घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत तिघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला होता. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे. घटनेने मांडवा पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:338) भोजन प्रसाद ग्रहण करने का सही नैसर्गिक नियम

(भाग:338) भोजन प्रसाद ग्रहण करने का सही नैसर्गिक नियम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हिंदू …

(भाग:337)भोजन ग्रहण करने के पूर्व एवं पश्चात स्मरण करना चाहिए निम्नमंत्र

(भाग:337)भोजन ग्रहण करने के पूर्व एवं पश्चात स्मरण करना चाहिए निम्नमंत्र टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *