Breaking News

भूसंपादन न करता तयार झाला रस्ता, शेतकऱ्यांची ओरड…. वाचा

Advertisements

 

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
शेताच्या बाजूने रस्ता तयार करायचा असल्यास भूसंपादन प्रक्रिया केली जाते. मात्र, किरकोळ भूसंपादन करून रस्ता तयार केल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे.

Advertisements

सातारा जिल्ह्याला वेगवान करण्यासाठी अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले. पुणे- बेंगलोर या 4 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता देखील मिळाली. आता सातारा- लातूर हा महामार्ग रस्ते विकास महामंडळाने गेल्या तीन वर्षात तयार केला आहे. सातारा, कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यातून हा रस्ता जातो. मात्र, अनेक ठिकाणी भूसंपादन न करताच हा रस्ता करण्यात आला. त्यामुळे भूसंपादन कधी होणार, त्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.

किरकोळ गटाचे भूसंपादन

रस्त्यासाठी अत्यल्प भूसंपादन करावे लागले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. काही किरकोळ गटाचे भूसंपादन करून शेतकरी वर्गाला याची कल्पना ही देण्यात आली नाही. काही लोकांनी आवाज उठवला असता. दुसऱ्या वेळी निवेदा काढून भूसंपादन करण्यात आले, तर काही ठिकाणी नागरिकांना या वरती कोर्टात धाव घेतली असल्याचे शेतकरी सांगतात.

सगळं होत असताना सर्वसामान्य लोकांना याची पुसटशी ही कल्पना देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठेकेदार यांनी दंडिलशाहीने रस्ता करून घेतला. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. याकडे शासन लक्ष देणार का, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मंत्री बावनकुळे करणार १५२ महसूल अधिकाऱ्यांना निलंबित

जमिनीच्या नोंदींमध्ये बेकायदेशीरपणे बदल केल्याप्रकरणी तब्बल १५२ महसूल अधिकाऱ्यांवर राज्य सरकारकडून मोठी कारवाई केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *